जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यापार

येत्या २७ एप्रिल पासून कोपरगावात एक्स्पो-२०२२ सुरू होणार-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर आगामी २७ एप्रिल रोजी पाच दिवसासाठी एक्स्पो-२०२२चे आयोजन करण्यात आले असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष राम थोरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच कोपरगाव लायन्स क्लब व लिओ क्लब आयोजित कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह प्रायोजित एक्स्पो -२०२२चे आयोजन २७एप्रिल ते ०१मे महाराष्ट्र दिनापर्यंत आयोजन करण्यात आले आहे त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन लायन्स पार्क येथे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष राम थोरे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,लिओचे अध्यक्ष आदित्य गुजराथी, पराग शिंदे,धारामचंद बागरेचा,एक्स्पो समितीचे संचालक राजेश ठोळे,सुरेश शिंदे,पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येनं मुंदडा,लायनेस क्लबच्या अध्यक्षा भावना गवांदे,डॉ.वर्षा झंवर,डॉ.अस्मिता लाडे,गोदावरी दूध संघाचे मार्केटिंग व्यवस्थापक औताडे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे बोलताना म्हणाले की,कोपरगाव शहराची बाजारपेठ उध्वस्त का झाली याचे उत्तर शोधण्याची गरज असल्याची प्रतिपादन केली आहे.व शहरातील संघटनांना बाहेरून यशस्वी उद्योजक बोलविण्याची गरज का निर्माण झाली ? असा रास्त सवाल विचारून एके काळी कोपरगाव शहर गुळ आणि नंतर साखर व कापड बाजार प्रसिद्ध होती मात्र आज ही अवकळा का आली ? याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन करून तालुक्यातील नेत्यांचे व उपस्थितांचे कान टोचले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक लायन्स क्लबचे अध्यक्ष राम थोरे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन पराग संधान,राजेश ठोळे,लायनेस क्लबच्या अध्यक्षा भावना गवांदे,अड.विजय गवांदे यांनी केले आहे.

सदर एक्स्पोत विविध यशस्वी उद्योजक,व्यापारी यांचे मार्गदर्शन,व मुलाखती घेण्यात येणार आहे.तर विविध सिने कलावंत उपस्थित राहणार आहे.विविध स्पर्धा व त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसाद भास्कर यांनीं केले तर उपस्थितांचे आभार सुरेश शिंदे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close