जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात भाजपचे आ.पडळकर यांची पीडित कुटुंबास भेट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील १०५ हनुमान नगर या उपनगरातील रहिवासी असलेली आपली मुलगी आपल्या अंगणातील पाणी झाडून लोटत असताना त्याला त्याच भागातील आरोपी अमजद जाफर मन्यार सहा आरोपींनीं आदींनी हरकत घेऊन फिर्यादी महिलेच्या मुलीस लोखंडी गजाने मारहाण केल्याची फिर्याद मुलीची आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवली होती.या प्रकरणी आज भाजपचे आ.गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन सहानुभूती व्यक्त केली आहे.या घटनेत महिलेची मुलगी गंभीर जखमी झाली होती.

भाजप आ.पडळकर यांनी विनायक गायकवाड यांचे घरी काही काळ भेट दिली असून या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे.त्यानंतर ते जिल्हा पोलीस अधीक्षक यांची नगर येथे भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या भेटीने पिडीत कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व आरोपी अमजद मण्यार यांचे घर शेजारी-शेजारीच आहे.दि.२६ ऑगष्ट रोजी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व महिलेची मुलगी हि त्यांचे अंगण झाडत असताना त्यांच्या हातातील झाडूच्या सहाय्याने पाणी लोटीत असताना त्याचा आरोपीस राग येऊन त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी अहमद मण्यार याने त्याच्या हातातील लोखंडी गजाच्या सहाय्याने फिर्यादी माहिलेच्या उजव्या हातावर व पायावर मारून जखमी केले व आरोपी अमजद मनियार,रुबीना समजत मणियार,उजमा मनियार,जेबिन जरा मनियार,सोनू जलार मणियार यांनी फिर्यादीची मुलगी हिला लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली.व आरोपी अहमद मण्यार याने फिर्यादी या महिलेच्या इज्जतीला हात घातल्याचा व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप केला होता.या बाबत फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान या घटनेत फिर्यादी महिलेची मुलगी हि जखमी झाली होती.त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले होते.त्याचा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे निषेध करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२६३/२०२१ प्रमाणे दाखल केला होता.व आरोपींना अटक करण्यात आली होती.त्याचे तीव्र पडसाद राज्यातही उमटले असून आज भाजप नेते आ.गोपीचंद पडळकर यांनी या दलित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आधार दिला आहे.

सदर प्रसंगी भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,अक्षय म्हसे,शुभम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.या भेटी नंतर आ.पडळकर यांनी विनायक गायकवाड यांचे घरी काही काळ भेट दिली असून या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे.त्यानंतर ते जिल्हा पोलीस अधीक्षक यांची नगर येथे भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close