विशेष दिन
कोपरगाव तालुक्यात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील शिवबालक व शिवअमृत महाविदयालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठया उत्सहात साजरी झाली आहे.
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष शिवाजी लावरे सर,विद्यार्थी शिक्षक वृंद यांनी प्रतिमा पूजन केले.या कार्यक्रमात जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यानी मोठा सहभाग घेतला होता.विद्यार्थी भाषणे होऊन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारीत विद्यार्थी नी आपल्या भाषणात नमूद केले.आज खरोखर जिजाऊ च्या विचारांची आवश्यकता आहेत तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची प्रेरणा युवकांनी घ्यावी व आपले आदर्श जीवन जगावे असे देखील नमूद करण्यात आले. सर्वच विद्यार्थी भाषणे उत्कृष्ट झाली.सोनाली गव्हाळे या विद्यार्थीनीने अतिशय आत्मविश्वासाने उपस्थिताची मने जिकंली व शिवबालक चा सार्थक भुजाडे व नंदिनी त्रिभुवन,साक्षी देवकर,श्रुती देवकर यांनी “माता जिजाऊ चे उपकार फिटणार नाही “हे गीत कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
दरम्यान सदर प्रसंगी शिवाजीराव लावरे यांनी,”आदर्श पुरुषांचे विचार च आपल्या विद्यार्थी जीवनाला कलाटणी देतील त्यांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवावा असे सांगितले.
सदर प्रसंगी पगारे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन श्रीमती सोनवणे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन गोरखा मॅडम यांनी मानले आहे.