जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

कोपरगाव पालिकेचा अभिनव उपक्रम “एक राखी जवानो के नाम”

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत असतांना कोपरगाव नगरपरिषदे मार्फत शहरात विविध नगर परिषदेच्या वतीने सीमेवर लढणाऱ्या जवानांना एक राखी पाठविण्यासाठी उपक्रम आयोजित केला असून त्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

इतरांपेक्षा नवीन उपक्रम राबविण्यासाठी मुख्याधिकारी गोसावी यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांची आठवण ठेऊन नगरपरिषद शाळेतील विद्यार्थिनींना एक उपक्रम दिला असून त्यात या २६० विद्यार्थिनी सहभागी होणार आहे.यात उर्दू शाळेतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत.रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने प्रत्यक्षात नगर येथिल जवानांच्या कार्यस्थळी जाऊन त्यांना राखी बांधण्याचा मानस व्यक्त केला आहे.

वर्तमान कालखंडात केंद्र सरकार देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे.त्यानिमित्त “हर घर तिरंगा” सारखा उपक्रमासह,विविध शालेय स्पर्धा चित्रकला,वकृत्व,निबंध स्पर्धा,प्रभात फेरी आदींचे आयोजन करण्यात आले आहे.या खेरीज नवीन उपक्रम राबविण्यासाठी मुख्याधिकारी गोसावी यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांची आठवण ठेऊन नगरपरिषद शाळेतील विद्यार्थिनींना एक उपक्रम दिला असून त्यात या २६० विद्यार्थिनी सहभागी होणार आहे.यात उर्दू शाळेतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत.रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने प्रत्यक्षात नगर येथिल जवानांच्या कार्यस्थळी जाऊन त्यांना राखी बांधण्याचा मानस व्यक्त केला असता कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोसावी यांनी सदर उपक्रमाची दखल घेतली आहे.आणि यापैकी ३२ मुलींना नगर येथे जाण्यासाठी बसची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

सदरचा उपक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पटारे,शबनम खान,शोभा गाडेकर,कैलास साळगट,मु.बशिर खान,गोपाळ कोळी,शेख नसीम शेख,शेख अंजुम,एम के आढाव विद्यालयाच्या भावना गवांदे आदींनी परिश्रम घेतले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांचेसह शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close