जाहिरात-9423439946
विशेष दिन

…या शहरात स्वा.सावरकर जयंती संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    हिंदू महासभेचे अध्यक्ष व क्रांतिकारक,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच,महाराष्ट्र प्रांत,धर्मयोध्दा माजी खासदार स्व.भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण,महाराष्ट्र प्रांत आणि मुंजोबा गणेश मंदिर,यांचे सहभागातून स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटना यांचे वतीने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर चौक कोपरगांव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

  

स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर कोपरगांव येथे आले होते.कोपरगांव शहरातील जुने गांवठाण भागातील शनी मंदिर समोरील मैदानावर त्यांची स्वातंत्र्य जनजागृती सभा झाली होती.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोपरगांव येथील प्रथम संघ चालक स्व.गंगाधरजी तथा अण्णा बागुल यांचे “पथसंचलन”या पुस्तकात पृष्ठ १३ वर त्याचा उल्लेख आढळून येतो.

   याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री दिपक शिनगर,स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटनेचे एकनाथ हिवाळे,निलेश साबळे,राजेंद्र कुदळे,अनिल काले,राजकुमार हलवाई,सचिन साबळे,अमोल हलवाई,नरेंद्र डंबीर,योगेश वाणी,राजेंद्र कुदळे,बाबासाहेब जंगम,सुनील गोखले,सुरेश जोरे,रविंद्र जोशी,दिलीप अरगडे,रितेश कुदळे,नितीन काले,मुकुल आहेर,गोविंदराम चावला,गणेश वाणी,अनिल पारख,दिपक कानकुब्जी,इब्राहिम बागवान,रमेश पवार,शेखर ठोंबरे,सुरेश भोईर,दिपक शिंदे,भाऊसाहेब गुढगे, सोमनाथ व्यवहारे,रमेश गोसावी,किशोर मांडगे,यांचे सह राष्ट्रप्रेमी नागरिक,छोटे व्यापारी उपस्थित होते.सुत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले.प्रारंभी प्रतिमापुजन करून लाडू वाटप करण्यात आले.या प्रसंगी “स्वातंत्र्यवीर अमर रहे,भारत मात की जय, वंदेमातरम्” जयघोष करण्यात आला.

   स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच महाराष्ट्र प्रांतचे वतीने सुमारे ११०० नागरिकांना समर्पणसेवेतून स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट दाखविण्यात आला आहे.स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटनेच्या माध्यमातून श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा,प्रजासत्ताक दिन,शिवजयंती,श्री रामनवमी सारखे उत्सव आयोजित केले आहे.

   स्वातंत्र्यवीर वि.दा.तथा तात्याराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासाचे “सुवर्णपान”. सन १८८३ ते १९६६ हा सावरकर यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे.स्वातंत्र्य चळवळ,अस्पृश्यता निवारण,प्रखर राष्ट्रभक्ती या सह त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन राष्ट्र विचार धारेला एक उंचीवर नेतो.

  

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close