विशेष दिन
साक्षर समाज निर्मितीत महात्मा फुलेंचे मोठे योगदान-अभिवादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशात पहिली मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू करुन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. समाजसुधारक,विचारवंत,लेखक,तत्त्वज्ञ,स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते म्हणून महात्मा फुले यांचे नाव आजही अत्यंत आदराने घेतले जात असून साक्षर समाजाच्या निर्मितीत महात्मा ज्योतिबा फुले याचं अमुल्य योगदान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव शहरातील माळी बोर्डिंग येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आ.काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,माजी गटनेते विरेन बोरावके,माजी नगरर्सेवक मंदार पहाडे,अड्.मनोज कडू,फकीर कुरेशी आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी समर्पित करून शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांसाठीही काम केले.यासोबतच मुलींना शिक्षण देण्यासाठी मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली.समाज सुधारणेसाठी बालविवाह थांबवणे आणि विधवांचे पुनर्विवाह सुरु केले.महात्मा फुलेंनी समाज सुधारणेसाठी महत्त्वाचं कार्य केलं आहे.संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजातील रंजल्या-गांजल्या घटकांसाठी अखंडपणे कार्यरत राहून त्यांना जगण्याचे बळ आणि दिशा दिली.महात्मा फुले यांचे अनमोल विचार समाजाला प्रेरणा देणारे आणि क्रांती निर्माण करणारे असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.
माळी बोर्डिंग येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अभिवादन करतांना आ.आशुतोष काळे