जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन्य जीव

शेतात बछड्यासह वाघ,कोपरगाव तालुक्यात भीतीचे वातावरण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके शिवारात गत सप्ताहापासून वाघाने आपल्या बछड्यांसह ठाण मांडल्याने जवळके आणि परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाला याबाबत सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थानीं संताप व्यक्त केला आहे.व तातडीने या वाघाच्या बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान याबाबत कोपरगाव येथील वन विभागाच्या महिला अधिकाऱ्यास याबाबत सोमवार दि.१० एप्रिल रोजी सकाळी ०९ वाजेच्या सुमारास याबाबत कल्पना देऊन त्यांनी बंदोबस्त करण्याचे आश्वासन देऊनही त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे जवळके आणि परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वाघ हा वन्य जीव याचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते.आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत.यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला.वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे.

दरम्यान वाघ उत्तर अ.नगर जिल्ह्यातील अकोले वगळता अन्य ठिकाणी अभावाने आढळत असत.मात्र अलीकडील काळात पावसाचे प्रमाण वाढल्याने व त्यास लपन निर्माण झाल्याने वाघ हा हिंस्र प्राणी संगमनेर,कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर तालुक्यातील सपाट भु-प्रदेशात आढळू लागला आहे.गेल्या काही महिन्यात तर कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,सोनेवाडी,जवळके आदी ठिकाणी तो वांरवांर आढळत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील जवळके शिवारात घडली असून गावाच्या वायव्येस साधारण दोन कि.मी.अंतरावर असलेल्या थोरात वस्तीच्या नजीक बहादराबाद पाझर तलावाच्या आतील भागात नवनाथ पुंजा थोरात या शेतकऱ्यांच्या गिन्नी गवतात त्याने आपले वसतिस्थान बनवले आहे.त्यामुळे आपल्या पशुधनास सदर गवत आणण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यास त्याचे आपल्या बछड्यासह वारंवार दर्शन होत आहे.अनावधानाने संबधीत शेतकरी जवळ गेल्यावर तो गुरगुरत असून तो आपल्या बछड्यांच्या बचावासाठी शेतकरी व त्यांच्या कुटुंबावर हल्ला करू शकतो असा अंदाज व्यक्त होत आहे.त्यामुळे जवळके,बहादरपूर,बहादरपूर,शहापूर,पाथरे,पोहेगाव,सायाळे आदी परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close