जाहिरात-9423439946
वन्य जीव

कोपरगाव तालुक्यात आढळला बिबट्या,शेतकऱ्यांत घबराहट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वेस ग्रामपंचायत हद्दीत डोऱ्हाळे रोडलगत आज सकाळी वाळकी बस स्थानकाजवळ आज सकाळी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असल्याने वेस,सोयगाव,वाळकी परिसरातील शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.

बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री,पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे.यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.अशीच घटना आज सकाळी कोपरगाव तालुक्यातील वेस ग्रामपंचायत हद्दीत घडली असून त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्या,बिबळ्या किव्हा वाघरू हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे,परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे.अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात.खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे.भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री,पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे.यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.अशीच घटना आज सकाळी कोपरगाव तालुक्यातील वेस ग्रामपंचायत हद्दीत घडली असून त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र तो मृत अवस्थेत असल्याची माहिती नजीकच्या शेतकऱ्यांनी सांगितली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोन मोठे हिंस्र प्राणी व दोन त्यांचे लहान बछडे वेस परिसरात कोल्हे वस्तीनजीक काही शेतकऱ्यांना आढळले होते.मात्र जागे होऊन त्यांनी बॅटरीच्या सहाय्याने शोध घेतला सता त्यांना चार प्राणी असल्याचे दिसून आले होते. मात्र नेमके ते कोणते प्राणी आहेत याचा त्यांना बोध घडला नव्हता.मात्र सकाळी सात वाजेच्या सुमारास काही दूध संस्थेस दूध घालण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांना दोन बिबटे एका छोट्या बिबट्यास नजीकच्या मका शेतात ओढून नेताना आढळून आले होते.मात्र ते का ओढून नेत आहे याचा बोध घडला नव्हता.दरम्यान काही शेतकऱ्यांनी धाडस करून माग काढुन त्या परिसरात जाऊन पहिले असता त्या ठिकाणी एक बिबट्याचे मृत अवस्थेत एक आतडे बाहेर पडलेले बछडे आढळले होते.व रस्त्यावर काही रक्त सांडलेले दिसत होते.काही नजीकच्या शेतकऱ्यांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास धडक झाल्याचा आवाज ऐकलं होता.मात्र भीतीपोटी ते बाहेर आले नव्हते.मात्र सकाळी या घटनेने तो एखाद्या अज्ञात वाहनाने त्या धडक दिल्याचे व त्यात तो मृत झाल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान या प्रकरणी अद्याप वन विभागाचे अधिकारी तेथे उशिरा पर्यंत पोहचले नव्हते.या घटनेने वेस,सोयगाव,वाळकी,जवळके,धोंडेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.अन्य बिबटे त्या भागात असल्याने हि भीती कारणीभूत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close