जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन्य जीव

वन विभागाकडून शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

देवळाली प्रवरा -(प्रतिनिधी)

देवळाली प्रवरा हद्दीमध्ये आंबि रस्ता चरावर गुरुवारी रात्री बिबट्याने हल्ला केल्या त्यात दोन शेळ्या ठार तर दोन जखमी झाल्या होत्या.मात्र त्याकडे वणवा वन विभागाणे कानाडोळा केला होता.प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने वन विभागाचे दारात शेळीचा दफनविधी करण्याचे आंदोलनाचा इशारा देताच सोमवारी वन विभागाचे राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.जे.पाचारणे,वनपाल रायकर,वनरक्षक सतीश जाधव आदी सुतासारखे सरळ झाले होते.त्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याने ठार केलेल्या नाना दिवे तसेच मीरा चव्हाण,रतन पवार आदी शेतकऱ्यांच्या घरी भेट देवून पंचनामा केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री,पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे.यामुळेच नगरसह राज्यात दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.बिबट्या हा मुख्यत्वे जंगलातच रहाणे पसंत करतो.मात्र अलीकडील काळात त्याचे खाद्य दुर्मिळ होत असल्याने तो मनुष्य वस्तीत घुसताना आढळत आहे.अशीच घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात वारंवार उघडकीस येत आहे.मात्र त्याकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहे.

सदर प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस,प्रतिक दळे,शिवा मोरे,भाऊसाहेब पाळंदे,आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

प्रसंगी राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.जे.पाचारणे यांनी ज्यांचा शेळया बिबट्याच्या हल्यात दगावल्या आहेत त्या सर्व शेतकरी व नागरीकांना वन विभागाचे वतीने तातडीने मदत मिळवुन देण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.प्रसंगी आप्पासाहेब ढूस यांनी वन विभागाचे आभार व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close