महसूल विभाग
कोपरगाव तालुक्यात कुंभारी,सुरेगांव येथे शासकीय वाळू डेपो सुरू होणार

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगांव येथे पुढील आठवड्यात वाळू साठवणूक तसेच विक्री डेपो सुरू करण्यात येणार आहेत. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या वाळू डेपोंचे उद्घाटन होणार आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी केले आहे.
“शासकीय वाळू धोरणानुसार हे शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात येणार आहेत.या डेपोतून प्रत्येकाला ६०० रूपये ब्रास दराने वाळू उपलब्ध होणार आहे.प्रधानमंत्री आवास योजना,शबरी आवास योजना,रमाई आवास योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकूल धारकांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे”-संदीपकुमार भोसले,तहसीलदार,कोपरगाव.
आता नवीन वाळू धोरणानुसार महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूची विक्री केली जाणार असल्याची घोषणा राज्याच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ०१ मे रोजी केली होती.त्यामुळे आता वाळू स्वस्तात मिळणे शक्य होणार असा नागरिकांचा विश्वास वाढला होता.यासंबंधी राज्याचे महसूल मंत्री यांनी वाळूच्या अवैध उत्खनन प्रतिबंधासाठी राज्य सरकार घरपोच वाळू देणार असल्याचे सांगितले होते.मात्र याबाबत कोपरगाव तालुक्यात अशी एक ब्रास वाळू नागरिकांना देण्यात आलेली नाही हे विशेष.आता तर पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन आठवडे उलटल्यानंतर हि बातमी आज समोर आली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”शासकीय वाळू धोरणानुसार हे शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात येणार आहेत.या डेपोतून प्रत्येकाला ६०० रूपये ब्रास दराने वाळू उपलब्ध होणार आहे.प्रधानमंत्री आवास योजना,शबरी आवास योजना,रमाई आवास योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकूल धारकांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवीन वाळू धोरणानुसार सुरू होणाऱ्या या वाळू डेपोमुळे अवैध वाळू उत्खन्न व वाहतूकीवर आपोआपच बंदी येणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक शासकीय वाळू डेपोमधून स्वस्तात वाळू खरेदी करणार आहेत असे ही श्री.भोसले यांनी शेवटी सांगितले आहे.