पुरस्कार,गौरव
“राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार” कोपरगावात…यांना प्रदान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार – २०१९” कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक,भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आला आहे.पुणे येथील यशदा प्रशिक्षण केंद्र येथे विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने दिलेला वनश्री पुरस्कार हा माझे सोबत काम करणाऱ्या प्रत्येक वृक्ष व पर्यावरण प्रेमींचा हा सन्मान आहे.माझ्या अनेक सार्वजनिक कार्यात साथ देणारे आई- वडील,कुटुंबिय,पर्यावरण प्रेमी नागरिक शिर्डी उपविभागासह कोपरगांव तालुकावासियांना हा पुरस्कार समर्पित आहे”-सुशांत घोडके,वनश्री पुरस्कार प्राप्त,स्वच्छता दूत.
सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र आणि पंचाहत्तर हजार रुपये असे या पूरस्काराचे स्वरूप आहे.वनश्री सुशांत घोडके यांना राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये दूसरा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाने सन्मानित आहे.
सदर प्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय.एल.पी.राव,महसूल व वन विभाग प्रधान सचिव (वने) बी.वेणूगोपाल रेड्डी,प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) डॉ.सुनिता सिंग,विभागिय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) अमोल थोरात,वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) हनुमंत धुमाळ,पुणे येथील विविध खात्यांचे अधिकारी,लोकप्रतिनिधी,शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन वन विभागाचे वतीने वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती,संस्था यांनी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.राज्यात वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.
महाराष्ट्र शासशाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार २०१९ स्विकारतांना त्यांचे वडील प्रकाश, आई अर्चना,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके,कोपरगाव विविध कार्यकारी सोसायटीचे(एम.पी.) चेअरमन वैभव आढाव,गितांजली आढाव,समाजसेवक रमेश रोडे,मनशक्ती केंद्राचे संतोष नलगे,योग शिक्षक संदिप नलगे,प्रा.संजय नामदे,कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष चांगदेव धनवटे,पुणतांब्याचे सरपंच डॉ.संदीप धनवटे,पाणी व पर्यावरण प्रेमी विनोद धनवटे,सूर्यतेजचे सुमित शिंदे,ऐश्वर्या बिडवे,गौरी वायखिंडे, युवराज नलगे तसेच पुणे व कोपरगाव,पुणतांबा येथील सहकारी हे त्यांचे समवेत होते.
पुरस्कार वितरण नंतर राज्यातील व पुण्यातील पर्यावरण प्रेमी आणि अधिकारी यांनी वनश्री सुशांत घोडके यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचालन पल्लवी चौधरी तर आभार वनसंरक्षक हनुमंत धुमाळ यांनी मानले.
महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय व्दितीय व विभागीय प्रथम एकाच वेळी घोषित झालेले अ.नगर जिल्ह्यातील ते पहिले व्यक्ती ठरले आहे.शिर्डी उपविभागात त्यांचे पर्यावरणावर लक्षवेधी कार्य आहे.