पुरस्कार,गौरव
कोपरगाव तालुक्यातील…या पत्रकारास विभागीय पुरस्कार जाहीर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व दै.मराठवाडा साथी यांच्या वतीने मागील ३ वर्षांपासून देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार-२०२३ ची घोषणा निवड समितीने केली असुन कोपरगाव तालुक्यातील घारी गावचे पत्रकार किसन पवार यांना यंदाचा पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यंदा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांसोबतच ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्कार व जनसंपर्कात विशेष कार्य करणाऱ्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना ‘कार्यगौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक विभागातून ही पुरस्कार देण्यात येणार आहे लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादेत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.पुरस्कार प्राप्त पत्रकार किसन पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यंदा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांसोबतच ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्कार व जनसंपर्कात विशेष कार्य करणाऱ्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना ‘कार्यगौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक विभागातून ही पुरस्कार देण्यात येणार आहे लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादेत या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल अशी माहिती राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात पत्रकार किसन पवार यांचे पत्रकारिता क्षेत्रात लक्षवेधी काम असून इतर विविध प्रकारच्या क्षेत्रातही काम केले आहे.या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असुन लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादेत या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल अशी माहिती राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली आहे.
पत्रकार किसन पवार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कोपरगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच चांदेकसारे,घारी,पोहेगाव सह पंचक्रोशीतुन त्यांचे अभिनंदन होत आहे.