जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

कोपरगावात यांना…”राष्ट्रीय पर्यावरण मित्र” पुरस्कार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील ‘गोदामाई प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्षआदिनाथ ढाकणे यांना,’राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था’ या जागतिक स्तरावरील संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिना निमित दिला जाणारा.’राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार -२०२२’ जाहीर झाला असून सदर पुरस्काराचे वितरण रविवार दि.५ जून रोजी होणार आहे.

घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात. याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे. परिसर स्वच्छतेचे महत्त्व हे जाणून घेत असतानाच अस्वच्छतेमुळे अनेक रोग आजार होतात हे लक्षात येते.हि बाब आदिनाथ ढाकणे यांनी लक्षात घेऊन त्यासाठी गोदामाई प्रतिष्ठान मार्फत आपले काम १६८ सप्ताह पासून सुरु केले आहे.

कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची स्वच्छता करण्याचे काम अविरतपणे करत असून त्यांच्या या स्वच्छता मोहिमेत सौरभ मुंगसे,निलेश पाटील,सोमनाथ पाटील यांचा सह ढाकणे यांचा मुलगा प्रज्वल व मुलगी वैष्णवी हे देखील सहभागी होऊन आपल्या परीने स्वच्छता करत असतात.त्या सोबतच ढाकणे हे गोदावरी नदी पात्रात अनेक देशी-विदेशी वृक्षाची लागवड करत करत असतात.

तसेच एक सामाजिक उपक्रम म्हणून गेल्या काही वर्षापासून आपल्या मित्र परिवाराला वाढदिवसा निमित्त इतर काही भेटवस्तू न देता एखाद्या औषधी देशी झाडाचे रोपटे भेट म्हणून देतात व वाढदिवस साजरा करत असतात.

तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते गोदासेवक चिन्मय उदगीरकर,जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह तसेच नाशिक येथील नमामी गोदा या संस्थेचे अध्यक्ष राजेश पंडित यांना वेळोवेळी कोपरगाव तालुक्यातील विविध भागात आणून वृक्ष लागवडीसाठी तसेच गोदावरी नदी पात्र व आपल्या परिसरातील छोटे-मोठे नदी-नाले त्यासोबतच आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम करत जनजागृती करत असतात.
ढाकणे यांनी गोदावरी नदी संबंधित जनजागृती करण्यासाठी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन एक छोटासा लघुपट देखील तयार केला होता.

त्यांच्या या कार्याची दखल घेत इंडेसम या आंतरराष्ट्रीय संस्थेने सामाजिक अभियांत्रिकी पुरस्काराने गौरविले आहे तसेच तेलंगणा राज्य शासन यांच्या सह आंध्रप्रदेश येथील कवी नत्राय विद्यापीठ,नांदेड गुरुद्वार,कोपरगाव नगरपालिका,शिर्डीचे प्रांताधिकारी आदींनी ढाकणे यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

या पुरस्काराचे वितरण शनिवार दि.५ जून २०२२ रोजी थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राळेगणसिद्धी पारनेर येथे होणाऱ्या कार्यक्रमात दिला जाणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close