पुरस्कार,गौरव
कोपरगावात “व्यापार भूषण पुरस्कार” जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात व राज्यात विविध व्यवसायाद्वारे आपला ठसा उमटवणाऱ्या विविध व्यावसायिकांचा स्व.बाळासाहेब साखरे ट्रस्ट द्वारे,”कोपरगाव व्यापार भूषण पूरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे.सदरचा कार्यक्रम रविवार दि.०३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता समता सभागृहात संपन्न होणार असल्याची माहिती ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रदीप साखरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगावात प्रसिद्ध व्यापारी स्व.बाळासाहेब साखरे यांनी आपल्या कर्तृत्वाने कोपरगाव शहर व नगर जिल्ह्यात आपला लौकिक स्थापित केला होता.त्यांच्या नावाने त्यांच्या सुपुत्रांनी त्यांच्या नावाने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून कोपरगाव शहरात विविध क्षेत्रात आपला लौकिक स्थापित करणाऱ्या व्यावसायिकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे राहणार आहे.तर कार्यक्रमाचे पुरस्कार मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी यांच्या हस्ते वितरित होणार आहे.
त्यात त्यांनी प्रथम पुरस्कारासाठी भन्साळी उद्योगास समूहाचे संस्थापक स्व.धनराजशेठ भन्साळी या शिवाय या ट्रस्टने पुणे येथील व्यावसायिक रामविलास मुंदडा यांनाही पुरस्कार जाहीर केला आहे.हा कार्यक्रम समता सहकारी पतसंस्थेच्या ‘समता’ सभागृहात रविवार दि.०३ एप्रिल रोजी सायंकाळी ०५.३० वाजता संपन्न होणार आहे.या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रदीप साखरे यांनी शेवटी केले आहे.