गुन्हे विषयक
‘त्या’आंदोलकांवर कोपरगावात अखेर गुन्हे दाखल,तालुक्यात खळबळ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने खा.सुप्रिया सुळे यांच्या बाबत आक्षेपार्ह शब्द प्रयोग केल्याबाबत कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना जोडे मारू आंदोलन करून निषेध केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दखल केल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दि.७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.५० वाजेच्या सुमारास कोपरगावात छत्रपतीस शिवाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिमेचे बॅनर घेऊन वरील पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित जमा होऊन घोषणाबाजी केली व कृषी मंत्री सत्तार यांचा पुतळा जाळला असल्याचे दिसून आले होते.हा गोंधळ जवळपास अर्धा तास सुरु होता.त्याविरुद्ध बारा जणांवर गुन्हा दखल केला आहे.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार,उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादीकडून सत्तार यांचा निषेध करण्यात येत आहे.कोपरगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध नोंदवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना निवेदन देऊन सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे त्यावेळी या घटनेची दखल घेऊन कोपरगाव शहर पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
दरम्यान या प्रकरणी अड्.नितीन पोळ यांनी म्हटले आहे की,”एखाद्या पक्षाची असो की सर्वसामान्य महिला असो मात्र महिलांविषयी अपशब्द वापरले जात असताना दुजाभाव करणे हे दुर्दैव आहे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे मात्र याबाबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी खंडन केले आहे व आपण ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा खंदारे यांच्यावरील टीकेचा निषेध केला असल्याचे म्हटलं आहे.
सदर गुन्ह्यात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक मंदार पहाडे,युवा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,राहुल देवळालीकर,वाल्मिक अहिरे,आकाश डागा,शैलेश साबळे,इम्तियाज आत्तार,अक्षय आंग्रे,कार्तिक सरदार,बाला गंगूले सर्व राहणार कोपरगाव आदींचा समावेश आहे.
या प्रकरणी पो.कॉ.संभाजी शिंदे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,”आपण व आपले सहकारी वाय.के.सुंबे आदींची दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजे पर्यंत कर्तव्यावर असताना वरील ठिकाणी कर्तव्य बजावत असताना दुपारी ४.५० वाजेच्या सुमारास छत्रपतीस शिवाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिमेचे बॅनर घेऊन वरील पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित जमा होऊन घोषणाबाजी केली व कृषी मंत्री सत्तार यांचा पुतळा जाळला असल्याचे दिसून आले होते.हा गोंधळ जवळपास अर्धा तास सुरु होता.आपण या प्रकरणी पोलीस निरिक्षक देसले यांना याबाबत खबर करून माहिती देऊन बंदोबस्त मागितला होता.सदर ठिकाणी काही वेळेतच पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पोलीस नाईक दारकुंडे,पो.कॉ.मासाळ,राम खारतोडे,गणेश थोरात,गणेश काकडे,आदी आले व त्यांनी त्यासाठी प्रतिबंध केला होता मात्र त्यांनी त्या बाबत ऐकले नाही.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी भीमराज शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३५९/२०२२ मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७(१) १३५अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.दारकुंडे हे करीत आहेत.