जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पशुसंवर्धन विकास

कोपरगाव तालुक्यात लंपीची लागण,दक्षता घ्या-..या नेत्याचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात अनेक जनावरांना लम्पी स्किन सदृश्य आजाराची लागण झाली आहे.या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांच्या आरोग्यासाठी हानिकारक असून वेळप्रसंगी जनावरांचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला असून काही जनावरे या आजारामुळे मृत्यूमुखी पडली आहेत.याची गांभीर्याने दखल घेवून पशूसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी पशु संवर्धन विभागाला दिल्या आहेत.

“कोपरगाव तालुक्यातील काकडी गावातील काही जनावरांमध्ये लम्पी रोगाचे विषाणू आढळून आले आहेत.लम्पी स्किन आजारामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होवून जनावरांना अनेक आजार होवू शकतात.त्यामुळे ज्या जनावरांमध्ये लम्पी स्किन सदृश आजाराचे लक्षण दिसत असून त्यावर पशुसंवर्धन विभागाने सत्वर उपाय योजना कराव्या”-आ.आशुतोष काळे,श्री अध्यक्ष साईबाबा संस्थान शिंर्डी.

राजस्थान,गुजरात,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश पाठोपाठ सध्या महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत.राज्य पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी आजार नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.कोपरगाव तालुक्यात या साथीची लागण झाल्याचे दिसत आहे त्यासाठी आ.काळे यांनी पशुसंवर्धन विभागाची बैठक आयोजीत केली होती त्यावेळी हे आवाहन केले आहे.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ना.आशुतोष काळे यांनी सांगितले की,”कोपरगाव तालुक्यातील काकडी गावातील काही जनावरांमध्ये लम्पी रोगाचे विषाणू आढळून आले आहेत.लम्पी स्किन आजारामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होवून जनावरांना अनेक आजार होवू शकतात.त्यामुळे ज्या जनावरांमध्ये लम्पी स्किन सदृश आजाराचे लक्षण दिसत आहे अशा जनावरांचे व त्या गावातील व परिसरातील सर्वच जनावरांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा जेणेकरून जनावरांमध्ये या आजाराची व्याप्ती वाढणार नाही व याची दक्षता घ्यावी.

लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशू धन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.शेतकऱ्यांनी देखील पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून ज्या जनावरांमध्ये लम्पी स्किन सदृश्य रोगाचे लक्षण दिसत असल्यास त्या जनावरांचा इतर जनावरांशी संपर्क येवू न देता योग्य काळजी घेवून जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.अजयनाथ थोरे,पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ.श्रद्धा काटे,डॉ.दिलीप जामदार आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close