जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पणन

सोयाबीन खरेदीला लाभला मुहूर्त ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

हमीभाव खरेदी केंद्र सुरू होऊन तब्बल महिन्याचा कालावधी लोटला तरी कोपरगावच्या आडत बाजारात मोठया प्रमाणात सोयाबीनची आवक होत आहे.सोयाबीनची आवक वाढल्याने दरात मात्र कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे शेतक-यांना सरासरी प्रतिक्विंटल मागे ५०० ते ६०० रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी नगर सह कोपरगाव तालुक्यातील सोयाबीनची पावसाळ्यात काढणी झाली असल्याने त्यात आद्रता जास्त असल्याने ती खरेदी होऊ शकली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.


 

दरम्यान आज सुरू झालेल्या या खरेदी केंद्राच्या उद्घाटनासाठी बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,उपसभापती गोवर्धन परजणे यांचे शुभहस्ते याचा शुभारंभ केला आहे.त्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्या विरोधात शेतकऱ्यांत मोठी नाराजी दिसून येत आहे.

   कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्हयात खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या.या मध्ये ४ ते साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला होता.सोयाबीन या पिकांची काढणी होऊन या शेतमालाची आडत बाजारात आवक सुरू झाली आहे.सोयाबीन या शेतमालास चांगला दर मिळावा म्हणून लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसल्यावर उशिराने शहाणपण आले होते.व त्यांनी गत महिन्यात दिनांक १५ ऑक्टोबर पासून ०४ हजार ८९२ रुपयांनी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली आहेत.त्यामुळे कोपरगाव बाजार समितीचा बाजाराचा ताण कांहीसा कमी झाला असला तरी सोयाबीनच्या दरात म्हणावी तशी वाढ झाली नाही.हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी आडत बाजारात सोयाबीन या शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत आहे.त्यामुळे शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.राज्यात निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने देखावा सुरू केला होता.कोपरगाव बाजार समितीचा कारभार त्याला अपवाद नव्हता.त्यांची अवस्था बैल गेला आणि झोपा केला अशी झाली असून त्यांना आता कुठे जाग आली असून कुंभकर्णी झोपेतून ही मंडळी जागी झाली आहे.त्यांनी आज या प्रकरणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले असून आता बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या अडचणीमुळे सोयाबीन काढून टाकली असताना यांचे हे उशिराने शहाणपण आता शेतकऱ्यांना किती कमी येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

   दरम्यान आज सुरू झालेल्या या खरेदी केंद्राच्या उद्घाटनासाठी बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,उपसभापती गोवर्धन परजणे यांचे शुभहस्ते याचा शुभारंभ केला आहे.त्यावेळी प्रथम शेतकरी विशाल लक्ष्मण धीवर कोकमठाण यांचा शाल श्रीफळ देऊ सत्कार करण्यात आला आहे.
 
   आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची नोंदणी केली असून १५० शेतकऱ्यांची नोंदनी प्रक्रिया सुरू आहे.सदर सोयाबीन खरेदी केल्यानंतर सदर बिलाची रक्कम सात दिवसांनी शेतकऱ्यांचे खात्यात जमा होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिली आहे.त्यासाठी सोयाबीन पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा,आधार कार्ड,बँक पासबुक झेरॉक्स,मोबाईल क्रमांक बाजार समितीकडे दिनांक १५ नोव्हंबरच्या आत देणे आवश्यक असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close