न्यायिक वृत्त
थकबाकीदाराने दिला खोटा धनादेश,कारावासाची शिक्षा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या,अ.नगर यांचेकडुन कर्जदार विनायक काशिनाथ बोंगा यांने घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी पतसंस्थेला धनादेश दिला होता मात्र सदर धनादेश न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर अ.नगर येथील फौजदारी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता या खटल्याची सुनावणी नुकतीच संपन्न होऊन यात कर्जदार विनायक काशिनाथ बोगा यास रु.२.१५ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला असून पतसंस्थेस नुकसान भरपाई देण्यात कसुर केल्यास आरोपीस आणखी अधिक १ महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.त्यामुळे खोटे धनादेश देणाऱ्या कर्जदारांत खळबळ उडाली आहे.
“कर्जदारांनी कोणत्याही पतसंस्थेस दिलेला धनादेश बँकेत वटतील याबाबत दक्षता घ्यावी अन्यथा अशा प्रकारची शिक्षा होऊन तुरुंगवासाची वेळ येऊ शकते यांचे भान ठेवावे.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील कलम १०१ कलम १५६ हे देखील अतिशय कठोर कायदे सहकारातील आहेत”-जनार्दन कदम,उप-महाव्यवस्थापक,समता नागरी सहकारी संस्था,कोपरगाव.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था हि सहकारी चळवळीत नावाजलेली संस्था असून या संस्थेच्या राज्यात विविध ठिकाणी शाखा आहेत.त्यातील एक अ.नगर येथे आहे.तेथील कर्जदार विनायक बोगा याने त्या शाखेतून कर्ज घेतले होते.व त्याची परतफेड सुरु झाली असता नगर येथील शाखेस एक ०१ लाख १७ हजार व ८२ हजार रुपयांचा धनादेश दिला होता.मात्र संस्थेने सदर धनादेश हा बँकेत भरला असता तो बनावट निघाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे संस्थेने या कर्जदाराचे विरुद्ध गुन्हा क्रं.एस.सी.सी.नं. ३९३२/२०२१ व एस.सी.सी.नं. ३५३९/२०२१ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २५५ (०२) व निगोशिएबल इन्स्ट्युमेंट अॅक्ट १८८१ चे कलम १३८ खाली फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली होती.त्याची नुकतीच सुनावणी संपन्न झाली आहे.
दरम्यान त्यात चौकशीअंती आरोपी विनायक काशिनाथ बोगा यांनी गुन्ह केल्याचे सिध्द झाल्याने अ.नगर येथील न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस ६ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.तसेच फिर्यादी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या,कोपरगांव शाखा अ.नगर यांना थकबाकीदार विनायक बोगा यांनी एकुण रु.२.१५ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे.आरोपीने सदर पतसंस्थेस नुकसान भरपाई देण्यात कसुर केल्यास आरोपीस आणखी अधिक १ महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.याकामी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगांव यांचेतर्फे ॲड.वृषाली तांदळे व शाखाधिकारी नरेश गुंजाळ यांनी कामकाज पाहिले होते.न्यायालयाच्या या आदेशाने कर्ज भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या अपप्रवृत्तीस चाप बसण्यास मदत मिळणार असल्याचे मानले जात आहे.