न्यायिक वृत्त
…त्या रस्त्यांचा निधी शासनास पुन्हा वर्ग करण्यास स्थगिती !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील गावांना जोडण्याकरिता स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षाच्या कालखंडात पहिल्यादा रस्त्यासाठी तरतूद होऊन सदर निधी निविदा अभावी परत जाणार असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यावर तेथील ग्रामस्थानीं उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात दावा दाखल केला होता त्यात त्यांना यश आले असून उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाने सदर निधी जैसे ठेवण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.व शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील दळणवळणासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या या ३० रस्त्यासाठी स्थगित केलेल्या रस्त्यांच्या निधीची आगामी सुनावणी एप्रिल २०२३ महिन्यात ठेवण्यात आलेली असून सदर प्रकरणात अॅड अजित काळे यांच्यासोबत अॅड.साक्षी काळे व अॅड.प्रतीक तलवार आदींनी काम पाहिले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महाविकास आघाडी सरकार असताना श्रीरामपूर तालुक्यात गावांना जोडण्याकरिता नवीन रस्ते व जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्याकरिता राज्य सरकारने सुमारे ०५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.यातील काही गावांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नवीन रस्ते मिळणार होते.तथापि रस्त्यांसाठी निधी मंजूर होऊन निविदा निघाली नव्हती.पण वर्तमान शिवसेना (शिंदे गट)-भाजप युती सरकारने महाविकास आघाडी सरकार अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या सर्व कामांवर २० जुलै रोजी व १२ ऑक्टोबर २०२२च्या पत्रांन्वये स्थगिती आणून सदर काम रद्द केले होते.त्यामुळे खंडाळ्यासह ३० गावातील ग्रामस्थांत संताप व्यक्त होत होता.त्यासाठी त्यांनी संघटित होऊन या प्रकरणी आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
सदर रस्त्यांकरिता मंजूर केलेला निधी परत शासनास वर्ग होऊ नये म्हणून महांकाळ वडगाव ग्रामपंचायत व मातुलठाण ग्रामपंचायत यांनी अॅड अजित काळे यांच्या मार्फत छ.संभाजीनगर येथील उच्च न्यायालय खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयाने सदर ग्रामपंचायतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा निधी सरकारकडे पुन्हा वर्ग करण्यास स्थगिती दिली असून सदर निधी संदर्भात यथास्थिती राखण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर निर्देश हे श्रीरामपूर तालुक्यातील खालील रस्त्यांच्या कामाकरिता व डागडूजी करिता देण्यात आले होते ते रस्ते खालील प्रेमाणे-मौजे खंडाळा येथील रांजणखोल मोरी ते खंडाला पूल येथील श्रीरामपूर हद्दीतील रस्ता,खोकर-खानापूर रस्ता (रा.मा.-२१६ ),प्रजिमा २१ ते वळदगाव-निपाणी वडगाव-खोकर-टाकळीभान- महांकाल वडगाव-सरला-नाऊर् रस्ता,नाऊर ते रामपूर रस्ता,गोवर्धन ते रामपूर रस्ता,नाऊर येथील गोपीनाथ शिंदे वस्ती रस्ता ते साईखेडकर गंगा जुना रस्ता,शिरसगाव ते इतर जिल्हा मार्ग-४१,शिरसगाव ते भोगळ वस्ती अंतर्गत रस्ता,वडाळा महादेव ते निपाणी वडगाव रस्ता,मौजे भैरवनाथ नगर ते तुपे वस्ती रस्ता,मौजे महांकाल वडगाव ते सरला रस्ता,शिरसगाव अंतर्गत रस्ते,मौजे खंडाळा येथील संगमनेर रोड ते ग्रामदैवत म्हसोबा मंदिर रस्ता,फत्याबाद ते बाबा आठरे वस्ती ते चांदेवाडी रस्ता,मौजे दत्तनगर ग्रामपंचायत हद्दीतील आर्या हॉटेल ते डी.पॉल इंग्लिश मीडियम स्कूल रस्ता,मौजे दत्तनगर येथील सूतगिरणी फाटा ते रेल्वे गेट पर्यंत रस्ता,मौजे गळणी ते चारी नंबर चार येथील पगारे वस्ती,भागवत वस्ती,बाचकर वस्ती,शिंदे वस्ती रस्ता,मौजे वडाळा महादेव ते क्रेशर रस्ता,मौजे-अशोकनगर-निपाणी वडगाव अंतर्गत रस्ता,पढेगाव जुना गावठाण ते बोधेगाव रस्ता आदी ३० रस्त्याचा समावेश आहे.
सदर प्रकरणात पुढील सूनावणी एप्रिल २०२३ रोजी ठेवण्यात आलेली असून सदर प्रकरणात अॅड अजित काळे यांच्यासोबत अॅड साक्षी काळे व अॅड प्रतीक तलवार आदींनी काम पाहिले आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.