जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

मुलीस पळवून नेणारा आरोपी अखेर जेरबंद,०२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल चंद्रभान जाधव (वय-२०) याच्या सांगली जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातून मुसक्या आवळल्या असून त्यास अटक केली आहे.त्यास कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मळेगाव थडी येथील आरोपीस ०२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

खेळण्या-बागडण्याच्या,शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे,संसार थाटण्याचे स्वप्न बघत असल्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच संपलेल्या वर्षी आतापर्यंत २६ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले असून यापैकी १० प्रकरणांमध्ये मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

चोरी-दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून,फूस लावून पळवून नेण्याच्या दररोज किमान चार घटना नगर जिल्ह्यात घडत आहेत.विशेष म्हणजे या अपहरणांमध्ये परिचयातील किंवा परिसरातील तरुणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे पोलिस तपासात वारंवार आढळत आहे.खेळण्या-बागडण्याच्या,शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे,संसार थाटण्याचे स्वप्न बघत असल्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच संपलेल्या वर्षी आतापर्यंत २६ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले असून यापैकी १० प्रकरणांमध्ये मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

दम्यान अशीच घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवार दि.२१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास घडली होती.त्या मूळे कोपरगाव तालुक्यातील पालकांत भीतीचे वातावरण पसरले होते.या कामी तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलून तपास सुरु केला होता.तेंव्हा सदर घटना जवळच्याच एका आरोपीने केली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते.त्यावरून त्यांनी सदर आरोपीचे भ्रमणध्वनीच्या स्थळनिरीक्षण केले असता सदर आरोपी हा सांगली जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाखार शिरोली या ठीकाणी दडून बसला असल्याचे लक्षात आले होते.त्यानुसार पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने त्या ठिकाणी आपले पथक पाठवून पाळत ठेवली असता सदर आरोपी हा साखर कारखान्याच्या ऊस तोडणी थळात नुकताच आढळून आला आहे.त्यास संबंधित तपासी अधिकारी पो.हे.कॉ.सुरेश बोटे व पो.कॉ.युवराज खुळे यांनी जेरबंद केले होते व त्यास काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्रं.-०१ मध्ये न्या.भुजंगराव पाटील यांच्या समोर हजर केले असता त्यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपी विशाल जाधव यास आगामी ०२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने अड्.अशोक वहाडणे यांनी काम पाहिले होते.

दरम्यान सदर मुलगी अल्पवयीन आढळल्याने पोलिसांनी आधीचे भा.द.वि.कलम ३६३ वाढवले असून त्यापुढे कलम ३७६,(२)(आय)(एन) बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे ४,८,१२,कलम आणखी वाढवले आहे.त्यामुळे संबंधित पालकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close