न्यायिक वृत्त
नव-तरुणांच्या हातात लवकर मोबाईल देऊ नका त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील-न्या.पाटील

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पालकांनी आपल्या घरातील नव-तरुणांच्या हातात लवकर मोबाईल देऊ नका.त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.सामाजिक संकेत स्थळावरील लघु संदेश आपण डिलीट केले म्हणून ते नष्ट होत नाही.ते तसेच असतात व पोलिसांच्या हातात मोबाईल गेला की सर्व मामला उघड होतो.मोबाईल वर बोलताना जपून बोला सर्व रेकॉर्ड होत असते असा सावधगिरीचा इशारा कोपरगाव येथील जिल्हा न्या.बी.एम.पाटील यांनी तरुण पिढीला आणि त्यांच्या पालकांना नुकताच एका कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना दिला आहे.
“सुवर्णकारांनी अवैध सोने देण्याघेण्या संदर्भात काळजी घ्यावी,कागदोपत्री व्यवहारात पारदर्शकता आणावी त्यामुळे आगामी काळातील धोके टळतील”-न्या.भगवान पडीत,अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोपरंगाव न्यायालय.
भारतीय विधी जागृती आणि प्रचार समिती छत्रपती शिवाजी रोड व व्यापारी संघटना,प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ,मुंबादेवी तरुण मंडळ,सराफ सुवर्णकार असोसिएशन आणि प्रभाग क्रं.६ मधील सर्व रहिवासी आदींच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय विधी जागृती आणि प्रचार अभियान दि.३१ ऑक्टोबर पासून दि.१२ नोव्हेंबर पर्यंत तालुक्यातील विविध गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्याला कोपरगाव वकील संघ व कोपरगाव तालुका विधी समिती,कोपरगाव पंचायत समिती,तहसील कार्यालय,तालुक्यातील विविध संघटना यांचे मोठे सहकार लाभले होते त्याचा सांगता समारंभ दि.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महालक्ष्मी मंदिर ‘अहिर सुवर्णकार भवन’ सराफ बाजार येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश क्रं.२ बी.एम.पाटील,अतिरिक्त जिल्हा अभीयोक्ता ए.एल.वहाडणे,वकील संघाचे अध्यक्ष एस.पी.खामकर तर कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,ऍड.एम.पी.येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
“अल्पवयीन मुलांच्या हातात त्यांचे पालक दुचाकी सारखी वाहने देत असून परिणामस्वरूप हे तरुण पकडले गेल्यावर त्यांच्या पालकांवर पोलिसांना नाईलाजाने गुन्हे दाखल करावे लागत आहे या बाबत पालकांनी जागृत राहून ही कृती टाळावी”-वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलीस ठाणे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”मनावर लहानपणी कोर्ट आणि वेळ यांचे समीकरण मनावर बिंबले होते.पण या क्षेत्रात आल्यावर सर्व समजले.समाज हा दुचाकी चालविण्यासारखे आहे.त्यात आत काय आहे हे नाही समजले तरी चालले चालेल मात्र गरजेपुरते जुजबी ज्ञान प्रत्येकाला हवे आहे.तसेच कायद्याच्या ओळखीचे तसेच आहे.आपल्याला जे गरजेचे आहे तेवढे कळाले तरी पुरेसे आहे.असे सांगून त्यांनी कायद्याच्या ज्ञानाचे असल्याचे सांगितले आहे.त्यावेळी त्यांनी सुवर्ण व्यवसायाचे काम व प्रमाणीकपणा याचे नाते जवळचे आहे त्याचे उदाहरण देऊन त्यांनी विश्लेषण केले आहे.त्यावेळी त्यांनी पत्नी सोबत सोनाराकडे व साडीच्या दुकानात जाणे सर्वात अवघड जात असल्याची मिश्किल टिपणी केली आहे.मात्र सराफ बाजारात जाताना सोबत पत्नीला न्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.त्यांना विश्वासात घेतले नाही तर कलम ४११,४१२,४१३ लागू शकते.सुवर्णकारांनी आपल्या दुकानात चलचित्रण सुरू ठेवावे व सर्व बाजूनी चेहरा दिसेल असे कॅमेरे बसवावे असे आवाहन केले आहे.कुटुंबातील कर्त्या पुरुषांनी तरुणांना वय वर्ष १८ झाल्याशिवाय मोबाईल हातात देऊ नका असे आवाहन केले आहे.खून झाल्यावर कोणी थांबत नाही या वास्तवावर त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले व वर्तन हे चुकीचे आहे.गुन्हा शेजारी घडतो तेंव्हा दुसरा नंबर तुमचा असू शकतो याची आठवण करून दिली आहे व संकटग्रस्त जात्यात तर आपण सुपात असल्याचे स्मरण करून दिले आहे.अलीकडे न्यायालय व पोलीस साक्षीदारांना सन्मानाची वागणूक देत आहे.त्यानां दिवसाची भरपाई व जाण्यासाठी भाडे दिले जाते.त्यामुळे साक्षीदार होण्यास घाबरू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे असे केले की,पोलिस,न्यायालय,वकील यांची गरज भासणार नाही असे आवाहन केले आहे.व कोपरगाव शहराचे आतील भागाचे कौतुक केले आहे.
सदर प्रसंगी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.भगवान पंडित हे बोलताना म्हणाले की,”सुवर्णकारांनी अवैध सोने देण्याघेण्या संदर्भात काळजी घ्यावी,कागदोपत्री व्यवहारात पारदर्शकता आणावी त्यामुळे आगामी काळातील धोके टळतील व असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक अभोयोक्त अशोक टूपके,प्रा.व्ही.पी.सुपेकर,अतिरिक्त सरकारी अभोयोक्ता अशोक वहाडणे,मनोहर येवले,वकील संघाचे अध्यक्ष शिवाजी खामकर,आत्मा मालिक एन.डी.आकादमीकचे प्राचार्य मयूर धोकचौळे,साईनाथ वर्पे,सूत्रसंचालन सुशांत घोडके यांनीं केले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमाकांत बाविस्कर,भाऊसाहेब बागुल,रामदास बागुल,पंडित यादव,सुनील फंड,कावेरी कपोते,उद्धवराव विसपुते,संतोष देवळाली कर,ग्रामसेवक महेश काळे,योगेश बागुल,विकास आढाव,ऍड.वैभव बागुल,बंडू बढे,सागर नगरकर आदींनी परिश्रम घेतले आहे.