न्यायिक वृत्त
कोपरगाव तालुक्यातील..’त्या’ गंभीर गुन्ह्यातील दोन्ही आरोपीस पोलीस कोठडी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मनेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या आईने आपल्या पोटच्या मुलीस वेस-सोयगाव येथील परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेण्यास बाध्य केल्या प्रकरणातील फिर्यादी मुलीची आई व वेस येथील आरोपी या दोघांना राहाता पोलिसांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान राहाता पोलीसांनी या प्रकरणी वेस-सोयगाव येथील आरोपी भडांगे आणि मनेगाव येथील मुलीची आई या दोघांना अटक करुन कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्रं.२ न्यायमूर्ती श्री पाटील यांचे समोर नुकतेच हजर केले होते.या प्रकरणी न्यायमूर्ती यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण फिर्यादी मुलीची आई व आरोपी भडांगे या दोन्ही आरोपीस मंगळवार दि.२० सप्टेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील मनेगाव येथील शिक्षण घेणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चक्क तिच्या जन्मदात्या आईनेच परपुरुषाच्या स्वाधीन करून सांगितले की,”तुला आरोपी भडांगे (रा.वेस.ता.कोपरगाव) नामक इसमा सोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील.आईच्या या अजब सूचनेला आठवीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला शिक्षणामुळे बऱ्यापैकी जाणीव झाल्याने तिने या कृत्यास ठाम विरोध केला होता.मुलीने नकार देताच आईने मुलीला दटावत,”आपल्या समाजात हि प्रथा असल्याने असे तुला असे करावेच लागत असते”,”तू जर असे केले नाही तर,तुझ्याकडे पहावे लागेल” असे म्हणून चक्क दम भरला व बळजबरीने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला आरोपी भडांगे नावाच्या इसमाच्या ताब्यात दिले व ती अल्पवयीन असल्याची माहिती असून सुद्धा तिच्या इच्छेविरुद्ध घरातील एका खोलीत नेऊन आरोपीने दुष्कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली होती.व पुन्हा त्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र मुलीच्या मामे भावाने यास वाचा फोडण्यास मदत केल्याने फिर्यादी मुलीने हा गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे कोपरगाव-राहाता तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली होती.या मामे भावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वतीने तिचा मामेभाऊ याने वेळीच सावधपणा दाखवत राहाता पोलिस ठाण्यात १६ सप्टेंबर रोजी मुलीच्या वतीने फिर्याद दाखल केली होती.व आरोपींवर गुन्हा रजिस्टर नोंदी क्रं.-४०७/२०२२ भा.द.वि.कलम ३७६ (२)( आय )( जे ) ५०६,३४ बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण अधिनियम कायदा कलम ४,६,१६,१७ (पोस्को) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान राहाता पोलीसांनी या प्रकरणी वेस-सोयगाव येथील आरोपी भडांगे आणि मनेगाव येथील मुलीची आई या दोघांना अटक करुन कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्रं.२ न्यायमूर्ती श्री पाटील यांचे समोर नुकतेच हजर केले होते.या प्रकरणी न्यायमूर्ती यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण फिर्यादी मुलीची आई व आरोपी भडांगे या दोन्ही आरोपीस दि.२० सप्टेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान पुढील तपास शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे करीत आहेत.