न्यायिक वृत्त
महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणार रोहित्र व पोल भाडे !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
विद्युत रोहित्रे आणि विजेच्या तारा शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून नेऊनही त्यांना नाक खाजवून दाखविणाऱ्या महावितरण कंपनीस विजेच्या पोल तारांचे भूभाडे संबंधात सूनावणी ९० दिवसात घेऊन निर्णय देण्याचा बीड जिल्हाधिकारी यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यानीं आनंद व्यक्त केला आहे.
महावीतरण कंपनीने विजेच्या तारा,पोल,ताण,रोहीत्र शेतकऱ्याच्या संमतीशिवाय नेले.ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीतून पोल तारा,ताण व रोहित्र आहे त्यांना त्या क्षेत्राचे भू-भाडे मिळाले पाहिजे असा कायदा आहे;परंतु अद्याप कूणीही ते महावितरण कंपनीकडे मागीतले नव्हते.व महावितरणने कुणालाही दिले नाही हे विशेष! शेतकऱ्यांना विजेच्या पोलचे,तारा,ताण,विद्युत रोहित्रांचे भाडे मिळाले पाहिजे.या साठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी शेतकऱ्यानी जिल्हाधिकारी यांचेकडे भू-भाडे मिळण्यासाठी अर्ज करण्याचें आवाहन केले होते त्यानुसार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी अर्ज दाखल केला होंता.त्यानुसार हा आदेश दिला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महावितरण कंपनी आपल्या ग्राहकांना वीज पुरवठा करताना अन्य शेतकऱ्यांच्या शेतातून सदरचे विद्युत पोल व रोहित्र टाकून अन्य ग्राहकांना आपला विद्युत पुरवठा करते.मात्र संबंधित शेतकऱ्यांना त्याचा कुठलाच मोबदला देत नव्हती.या बाबत शेतकरी संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे.हरियाणा,पंजाब राज्यात शेतकऱ्यांना संपूर्ण वीज पुरवठा मोफत करत असताना राज्य परिवहन कंपनी मात्र विद्युत ग्राहकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पठाणी वसुली करत आहे.सदर बिलात वेगवेगळ्या अनिर्णय करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावताना दिसत आहे.मात्र राजकीय पक्ष मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन बसले आहे.शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही महावीतरण कंपनी विद्युत बिलात सूट देण्यास मात्र टाळाटाळ करत आहे.शेतकऱ्यांना विजबील वसूली साठी वेठीस धरून सक्तीची वीज बील वसूली केली.तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रम्हदेव आले तरी विज बील भरावेच लागेल अशी रानाभीमदेवी गर्जना केली होती.
महावीतरण कंपनीने विजेच्या तारा,पोल,ताण,रोहीत्र शेतकऱ्याच्या संमतीशिवाय नेले.ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीतून पोल तारा,ताण व रोहित्र आहे त्यांना त्या क्षेत्राचे भू-भाडे मिळाले पाहिजे असा कायदा आहे;परंतु अद्याप कूणीही ते महावितरण कंपनीकडे मागीतले नव्हते.व महावितरणने कुणालाही दिले नाही हे विशेष! शेतकऱ्यांना विजेच्या पोलचे,तारा,ताण,विद्युत रोहित्रांचे भाडे मिळाले पाहिजे.या साठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे (औरंगाबाद खंडपीठ) यांनी शेतकऱ्यानी जिल्हाधिकारी यांचेकडे भू-भाडे मिळण्यासाठी अर्ज करण्याचें आवाहन केले होते त्याला प्रतीसाद देत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी पिंपळा व दौला वडगाव येथील शेतकऱ्यांचे अर्ज स्वतः जमा करून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात १४मार्च रोजी जमा केले व रितसर पोहच घेण्यात आली.परंतु बीड जिल्हाधिकारी यांनी कसलीही दखल घेतली नाही.
सदर प्रकरणी जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी ॲड.अजीत काळे यांची तक्रारदार शेतकऱ्यासह भेट घेतली व या प्रकरणी ॲड.अजित काळे यांच्या मार्फत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका क्रमांक-८१०८/२०२२ दाखल करण्यात आली होती.त्या याचीकेची नुकतीच ५ ऑगस्ट रोजी औरंगाबाद खण्डपीठाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठासमोर होऊन संबंधित खंडपीठाने बीड जिल्हाधिकारी यांनी ९० दिवसात शेतकऱ्याच्या अर्जावर सुनावणी घेऊन निकाल देण्यात यावा असे आदेश दिले आहेत.विजेच्या तारा,पोल यांचे भूभाडे मिळावे यासाठी महाराष्ट्रातील हे पहीलेच प्रकरण आहे.शेतकरी संघटनेतर्फे तर्फे शेतकऱ्यांना भूभाडे मिळाले पाहिजे म्हणून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी हा लढा उभारला आहे त्याला प्रतीसाद देत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी सदर विषयी न्यायालयीन लढाई सुरू केली व त्याला आज यश मिळाले आहे.
या न्यायालयीन लढ्यात पिंपळा येथील शेतकरी चंदू भागीनाथ शेंडगे,महादेव सूर्यभान सूंबे,चांदबेग बाबूबेग.मयूर महादेव सूंबे,भामाबाई शेंडगे,संपत शेंडगे,यांनी भूभाडे मागणीसाठी जिल्हाधिकारी,कार्यकारी अभियंता,अधिक्षक अभियंता बीड आदींकडे अर्ज दाखल केले होते.या निकालामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
या प्रकरणी उच्च न्यायालयाचे वकील व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.यानिकालामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत रोहित्र व पोलचे भाडे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.