जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

‘त्या’ गुन्ह्यातील आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

स्वस्तात स्टिल-सिमेंट देवून कोट्यावधींची लुट करणार शिवानंद पोलीसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याला कोपरगाव वरिष्ठ स्तर न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान या मोठ्या गुन्ह्यात अद्यापही फसवणूक झालेले नागरिक पुढे येण्यासाठी कचरत आहे.,ते पुढे आल्यास या तपासाला वेग मिळून आरोपीस त्याची शिक्षा देणे सोपे जाणार आहे.मात्र या पातळीवर शुकशुकाट असल्याचे आमच्या प्रतिनिधीस आढळून आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात तसेच कर्नाटक राज्यातील अनेक नागरीकांना स्वस्तात सिमेंट व स्टील देवून दुप्पट पैशाची कमाई करु देतो म्हणुन हजारो नागरीकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालणारा इचलकरंजी येथील महाठक शिवानंद दादु कुंभार (वय-४६ वर्षे) याला बेळगाव पोलीसांनी नुकतेच गजाआड केले असून बेळगाव पोलीसांनी आपला पोलिसी हिसका दाखवताच शिवानंद कुंभार याने आपल्या सर्व काळ्या कारणाम्याची कबुली देत आपण नागरीकांना फसवुन कोट्यावधी रुपये घेतल्याचे कबुल केले असल्याची बातमी आहे.त्यानुसार कोपरगाव,राहाता तालुक्यात या महाठगाचे मोठे जाळे असून त्यातील अनेक नागरिक,ठेकेदार संस्थाचालक आदींना त्याने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेला आहे.मात्र आपला काळा पैसा उघड होईल या भीतीने अनेकांनी अळीमिळी गुपचिळी घेतल्याने तक्रार द्यायला कोणीही पुढे येताना दिसत नाही.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसांपुढे मोठा गंभीर पेच तयार झाला आहे.

या घटनेची अधिक माहीती अशी की,”शिवानंद कुंभार याने अ,नगर,नाशिक बीड,कोल्हापुर,सांगली जिल्ह्यातील बहुतांश नागरीकांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवुन दिलेले पैसे स्टिल सिमेंटमध्ये गुंतवणुक करीत असल्याने अवघ्या काही महिन्यात दुप्पट पैसे देणार अशी खाञी दिली सुरुवातील काही वर्षे त्याने गुंतवणुकदारांना वेळेत परतावा देवुन अनेकांचा विश्वास संपादन केला.त्याच विश्वासाच्या बळावर गुंतवणुकदारांनी हजारातील गुंतवणुक लाखात व लाखातुन कोटीत गुंतवणुक करण्यास सुरुवात केली.काहींनी आपली स्थावर मालमत्ता विकून तसेच नातेवाईकांकडून उसने पैसे घेवून शिवानंद कुंभार या महा ठगाकडे आपल्या धनाची गुंतवणूक गु़ंतवली होती.त्याचा बरोबर फायदा उपटून सुमारे दोनशे-अडीचशे कोटींचा माल घेऊन हा ठग फरार झाला होता.

त्या नंतर हा आरोपी शिवानंद कुंभार गायब होताच हजारो गुंतवणुकदार रस्त्यावर आले होते.अनेकांचे संसार उध्वस्त झाले.काही गुंतवणुकदारांनी पोलीसात तक्रार दाखल केली अशाच तक्रारी कर्नाटक पोलीसांकडे आल्या होत्या.कर्नाटक पेक्षा महाराष्टातील विशेषतः अ.नगर व कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक नागरीकांना व व्यापाऱ्यांना शिवानंद कुंभार याने फसवले होते.परंतु महाराष्ट्र पोलीसांनी आरोपीला पकडण्या ऐवजी कानडी पोलीसांनी या महाठकास पकडुन गजाआड केले होते.

गेल्या वर्षभरापासून शिवानंद कुंभार हा फरार होता.तो विदेशात गेल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार बेळगावचे पोलीस शिवानंद कुंभारच्या शोधात होते.पोलीसांनी विदेशी दुतावास व इंटरपोलच्या मदतीने बेळगाव पोलीसांनी नेपाळच्या पोलीसांशी संपर्क साधुन अधिक माहीती घेतली असता.शिवानंद कुंभार हा आपल्या पत्नी मुलांसह मालदीव,इजिप्त मार्गे दुबई फिरुन नेपाळ येथे आला असुन तो मुंबई येथे २६ जून रोजी वेष बदलून येणार असल्याची माहीती बेळगावच्या पोलीसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीसांनी सापळा लावून ठक शिवानंद कुंभार याला २६ जुन रोजी पोलीसांनी बेड्या ठोकल्या अशी माहीती पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या यांनी माध्यमांना दिली होती. त्याला अटक केल्यानंतर त्यांच्या जवळील रोख २० लाख रुपये ताब्यात घेवून शिवानंद कुंभार नावाने असलेले सर्व बॅंक खाते गोठवण्यात आली आहेत.शिवानंद कुंभार याला अटक करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निंगन गौडा पाटील,पोलीस निरीक्षक बी.आर.गड्डेकर,काडय्या चरलिंगमठ,महेश वडियार व त्यांच्या सहकार्यांनी हि धाडशी कारवाई केली आहे.

शिवानंद कुंभार याला पोलीसांनी पकडल्याने गुंतवणुकदारांनी गुंतवलेले पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
त्याला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन नुकतेच कोपरगाव वरिष्ठ स्तर न्यायाधीश यांचे समोर हजर केले असता त्याची बाजू अड.दिलीप लासुरे यांनी मांडली तर सरकारी पक्षाची बाजू अड.व्यवहारे यांनी मांडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.तथापि न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या मोठ्या गुन्ह्यात अद्यापही फसवणूक झालेले नागरिक पुढे येण्यासाठी कचरत आहे.,ते पुढे आल्यास या तपासाला वेग मिळून आरोपीस त्याची शिक्षा देणे सोपे जाणार आहे.मात्र या पातळीवर शुकशुकाट असल्याचे आमच्या प्रतिनिधीस आढळून आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close