न्यायिक वृत्त
कोपरगाव तालुक्यातील….या ग्रामपंचायतीचे सरपंच पद अखेर रद्द
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत एकनाथ घुले यांचे पद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाने अखेर रद्द केल्याची माहिती अड्.दिलीप लासुरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे कोपरगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या बाबत विरोधी गटाचे नेते संजय घुले यांनी म्हटलं आहे की,”या प्रकरणात सत्याचा विजय झाला असून अपात्र असतानाही त्यांनी आपल्या पदाचा वापर करून जनतेत संभ्रम निर्माण केला होंता.तो आता दुर होणार आहे.त्या बाबत त्यांनी पेढे वाटून आंनद व्यक्त केला आहे.व विधी सहाय्य करणाऱ्या वकिलांचे आभार मानले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबर २०१७ मध्ये संपन्न होऊन त्यात आ.आशुतोष काळे गटाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून प्रशांत एकनाथ घुले यांची निवड झाली होती.तर त्याच गटाचे अकरा सदस्य निवडून येऊन त्याचे बहुमत झाले होते.माजी मंत्री कोल्हे गटाचा केवळ एक सदस्य निवडून आला होता.
दरम्यान सरपंच घुले यांचे विरोधक कार्यकर्ते संजय चंद्रभान घुले व दत्तू गजानन कदम त्यास हरकत घेऊन जिल्हाधिकारी यांचे कडे दि.०२ ऑगष्ट २०१९ रोजी अड्.दिलीप लासुरे यांच्या मार्फत नोंदवली होती.त्याचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दि.०१ ऑक्टोबर २०१९ रोजी घोषित करून त्यात सरपंच घुले यांच्या नातेवाईकांनी केलेला वन जमिनीत केलेले अतिक्रमण गृहीत धरून त्यांना दोषी धरले होते.व त्यांना अपात्र केले होते.
त्यांनी त्या नंतर याबाबत नाशिक विभागीय आयुक्त यांचेकडे अड्.संजय गाडे यांचे मार्फत दि.०५ फेब्रुवारी २०२१ रोजी अपील केले होते.त्याचा निकाल दि.०५ मे २०१९ ला जाहीर होऊन आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल कायम केला होता.
त्या विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात अड्.अजिंक्य काळे यांचे मार्फत दि.२८ मे २०२१ रोजी अपील केले होते.त्या बाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाचे न्या.मंगेश एस.पाटील यांनी आज रोजी निकाल जाहीर केला असून त्यात सरपंच प्रशांत घुले यांना अपात्र केल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे त्यांना आपला पदभार सोडावा लागणार आहे.याबाबत विरोधी गटाचे नेते संजय घुले व दत्तू कदम,विजय दगडू कदम,निलेश कदम,प्रमोद कदम,सतीश घुले,शिवाजी सुखदेव कदम,संदीप जनार्दन कदम,आदींनी आनंद व्यक्त केला आहे.