न्यायिक वृत्त
जलद न्यायासाठी न्यायालयावरील कार्यभार कमी करण्याची गरज-न्या.बोधनकर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जनतेला जलद न्याय मिळण्याची घाई आहे मात्र न्यायालयावरील कामाचा कारभार प्रचंड असून हजारो फाईल काही सेकंद कार्यवाहीसाठी हातात घ्यायच्या ठरवल्या तरी ते देऊ शकत नाही त्यामुळे न्यायालयांची ही मजबुरी लक्षात घेऊन त्यावर संसदीय उपाय योजना करायला हव्यात अशी अपेक्षा कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्या.एस.एम.बोधनकर यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे.
“कायद्याच्या जनजागृतीचे हे अभियान आपण राबवले असले तरी फार थोड्या लोकांपर्यंत आपण पोहचलो आहे.जास्तीच्या जनजागृतीसाठी हे अभियान आगामी काळात निरंतर राबवावे लागेल असे सांगून त्यांनी न्यायाची घाई काही वेळा अडचणीची ठरते असे सांगून पती-पत्नीचे भांडण हे झाले तरी बऱ्याच वेळा काही काळ गेल्यावर ते ताडजोडीवर येते अशा वेळी ही घाई प्रपंच मोडन्याचे पातक ठरू शकते”- न्या.एस.एम.बोधनकर,जिल्हा व सत्र न्यायाधीश कोपरगाव.
कोपरगाव तालुका विधी सेवा समितीच्या वतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानातंर्गत” कार्यक्रमाचा समारोप सोहळा शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या.एस.एम.बोधनकर हे बोलत होते.सदर प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश सयाजी कोऱ्हाळकर,वरीष्ठ स्तर न्या.एस.एन.सचदेव मॅडम,न्या.व्ही.यु.मिसाळ,न्या.ए.सी.डोईफोडे,न्या.जे.एम.पांचाळ,न्या.आर.ए.शेख,कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,वकील संघाचे अध्यक्ष शिरीशकुमार लोहकने,जेष्ठ विधिज्ञ व वकील संघाचे माजी अध्यक्ष अड.जयंत जोशी,अड.शंतनू धोर्डे,अड.मच्छीन्द्र खिलारी,अड.अशोक टूपके,अड.विकास सदाफळ,अड.एस.एम.वाघ,अड.आर.एस.जपे,सरकारी अभियोक्ता अड.अशोक वहाडणे,अड.सी.एम.वाबळे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक अड.अशोक वहाडणे,यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्या.कोऱ्हाळकर म्हणाले की,” महिलांचे सबलीकरण करण्याची जबाबदारी ही राजकीय जबाबदारी असून त्यावर लोकप्रतिनिधींनी संसदीय उपाययोजना करायला हव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.मात्र त्या पातळीवर दुष्काळाचं दिसून येत असल्याचा खेद व्यक्त केला आहे.सदर प्रसंगी अड.एस.एम.वाघ,अड.आर.एस.जपे,अड.एम.पी.येवले आदींनी मार्गदर्शन केले आहे.त्यावेळी अड.खिलारी यांनी देशाचे पंतप्रधानापासून गावचे सरपंच आदी घटक जनजागृती करण्यास सक्षम असताना ती वेळ विधिक्षेत्रावर आली यावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे.यावेळी शहरातील कार्यकर्त्या संगीता मालकर यांनी कायद्याचा महिलांना न्याय देताना अक्षम्य विलंब होतो,व पोटगीसाठी वारंवार भीक मागण्याचा अनास्था प्रसंग येतो हे दुर्दैवी आहे.हे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे अकल्पित उठून आवाहन केले.त्यावर या सभेचा नूर बदलून गेला व त्यावर उत्तर देण्याची जबाबदारी वकील संघाचे सदस्य अड.एम.पी.येवले यांचेवर येऊन ठेपली त्यांनी,”खटले जलद निकाली काढण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विशद केल्या साक्षी पुरावे घेताना वेळ देणे ही बाब अपिहार्य आहे व ती कायद्याने टाळता येत नाही या शिवाय न्याय देताना कोणावर अन्याय होणार नाही याची दखल घ्यावी लागते असे सांगितले आहे.सदर प्रसंगी कायद्याच्या जनजागृतीवर अड.वैभव बागुल यांनी वासुदेवाची भूमिका पार पाडून तर त्याना त्यांचे सहकारी अभिषेक शिंदे,अड.सौरभ पुंडे, दीपक सेनदाने,गी.ज्ञानदेव खेडकर,सुप्रिया,सलोनी केकान,गीतांजली जामदार रेणुका जाधव,मयुरी दंडवते,सुप्रिया बोधनकर गायत्री कुर्हे, गौरी भालेराव,आदींनी मदत केली आहे.कार्यक्रमाचा प्रारंभ शाहीर नंदकुमार खरात यांनी केला.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन न्या.पांचाळ व न्यायिक कर्मचारी आनंद सोनपसारे यांनी केले तर उपस्थितांचे तर उपस्थितांचे आभार न्या.शेख यांनी मानले आहे.कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने सौ.पूनम पांचाळ यांनी केली आहे.