न्यायिक वृत्त
लहान मुलीवर अनैसर्गिक कृत्य ‘त्या’आरोपीस न्यायिक कोठडीत रवानगी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सहयाद्री कॉलनीत पाहुणी म्हणून आलेल्या मात्र औरंगाबाद येथील मूळ रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीस अनैसर्गिक कृत्य करणारा नराधम दिलीप रामेश्वर पासवान (ह.रा.सह्याद्री कॉलनी.मूळ कठणपुर,ता.बेडम) बिहार येथील यास अटक करून त्यास कोपरगाव शहर पोलिसांनी दुसऱ्यांदा कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यास न्यायिक कोठडी सुनावली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी दिली आहे.
पाच वर्षीय मुलीचे आई वडील हे बाहेरगावी गेलेले असताना व ती आपल्या आत्याच्या रखवालीत असताना ती दि.रविवार दि.०७ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२.३० वाजेच्या सुमारास बाहेर खेळत होती.त्यावेळी आरोपीने तिच्याशी गोडगोड बोलून तिला पैसे देण्याचे आमिष दाखवून घरात बोलावून घेतले व तिचा विनयभंग केला होता.व तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केले होते.पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांनी आरोपीस अटक करून दि.०८ नोव्हेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाचे समोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.त्या नंतर आज हजर केले होते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला आपल्या लहान पाच वर्षीय मुलीचे आई वडील हे बाहेरगावी गेलेले असताना व ती आपल्या आत्याच्या रखवालीत असताना ती दि.रविवार दि.०७ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२.३० वाजेच्या सुमारास बाहेर खेळत होती.त्यावेळी आरोपीने तिच्याशी गोडगोड बोलून तिला पैसे देण्याचे आमिष दाखवून घरात बोलावून घेतले व तिचा विनयभंग केला होता.व तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार उघड झाला होता.
याबाबत अल्पवयीन मुलीचे आईवडील बाहेरगावी असल्याने मुलीच्या आत्याने या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस संजय सातव व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली होती.
व आरोपीस ताबडतोब ताब्यात घेऊन काल दुपारी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.श्री कोऱ्हाळे यांचे समोर हजर केले होते.त्यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.त्याची मुदत आज संपली होती त्यामुळे आज कोपरगाव शहर पोलिसांनी त्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले होते.त्यावेळी त्याची रवानगी न्यायिक कोठडीत केली असून त्याला जामीन मिळू शकतो असे बोलले जात आहे.