जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

बोगस कोरोना तपासणीअहवाल,एकाचा मृत्यू,खण्डपीठाच्या नोटिसा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

देशभरात कोरोनाने कहर उडवलेला असताना अनेक उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांची लूटमार केल्याची उदाहरणे समोर असताना आता थेट कोरोना रुग्णांची (आर.ती.पी.सी.आर.) बनावट तपासणी अहवाल तयार करणाऱ्या टोळीचा छडा लागला असून कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर व विळद घाटातील विखे हॉस्पिटल,नगर कोविड केअर सेंटर मनमाड रोड सावेडी,ग्लोबस पॅथॉलॉजि अँड इम्युनोअसे लॅब बालिकाश्रम रोड यांच्या विरुद्ध औरंगाबाद उच्च न्यायालयात तशी याचिका अशोक खोकराळे यांनी दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.याचिका कर्त्यांच्या वतीने अड्.अजित काळे हे काम पाहात आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अनेक वर्षांपूर्वी वैद्यकीय क्षेत्राचा ग्राहक संरक्षण कायद्यात समावेश केल्यापासूनच खरे तर अशा घटनांचे बी पेरले गेले आहे.वैद्यकीय क्षेत्रात फोफावलेले वाढते गैरप्रकार बघता या क्षेत्राचा ग्राहक संरक्षण कायद्यात समावेश करणेही अनिवार्य होते.वैद्यकीय नीतिमूल्ये आणि या क्षेत्राचे ‘पावित्र्य’ या बाबी तर कधीकाळीच चर्चेतून हद्दपार झाल्या आहेत.हे क्षेत्र मानवी जिवाशी थेट निगडित आहे आणि जिव्हाळ्याशिवाय उपचार होऊच शकत नाहीत हे खरे असले तरी डॉक्टर म्हणजे एक प्रोफेशनल,एक व्यावसायिक आणि रुग्ण म्हणजे ग्राहक हा काळाच्या ओघात घडून आलेला सामाजिक बदल आता मानला पाहिजे.

देशभरात कोरोनाने कहर उडवलेला असताना राज्यात कोरोना सर्वाधिक असल्याची नोंद आहे.यात सुरुवातील २०२० साली वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर या रुग्णांना हात लावत नव्हते.मात्र काहींनी धाडस करून या रुग्णांवर उपचार सुरू केले.त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.व त्यांना त्यात चांगला मलिदा मिळाल्याचे पाहून या क्षेत्रातील अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले तर नवल नव्हते.घडलेही तसेच.त्या नंतर या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटीने उचल झाल्याने व त्यात मृत्युदर मोठा असल्याने अनेकांचे धाबे दणाणले त्यामुळे अनेकांना पैसा कितीही जाऊ द्या पण आपले नातेवाईक रुग्ण वाचले पाहिजे अशी अवस्था झाली होती.त्यातून त्यांना आपला व आपल्या जवळच्या नातेवाईकांचा जीव वाचविण्यास प्राधान्य द्यावे लागले होते.या संकटाला खाजगी व सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संकटात संधी मानली व मन मानेल तशी या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची लुट सुरु केली असल्याचे दिसून आले आहे.एक कोरोना रुग्णास वाचविण्यास असे कोणतेही प्रभावी औषध नव्हते मात्र रमेडिसिविर या जीवघेण्या वापरास बंदी असलेल्या औषधांचा सर्रास वापर करण्यात आला. ते इंजेक्शन हजारो रुपयांना विकले गेले.ते विक्री करण्यासाठी राजकीय नेते,त्यांचे कार्यकर्तेही मागे नव्हते.त्यात दलाल,वैद्यकीय उपचार करणारे वैद्यकीय क्षेत्रातील दलाल यांचा सुकाळ निर्माण झाला होता.अनेकांनी लाखो नव्हे कोट्यवधी रुपयांची चांदी करून घेतली असल्याचे उघड झाले आहे.अनेकांनी नुकतेच उभे केलेले दवाखाने बँकेच्या कचाट्यातून काही महिन्यात सोडवले असल्याचे उघड झाले आहे.अनेक मेडिकलवाले मालामाल झाले आहे.यात माणुसकी थेट मारली गेली आहे.तिचा दिवसाढवळ्या खून करण्यात हि मंडळी मागे राहिली नाही.डॉक्टर हा दुसरा ‘परमेश्वर’ असतो असे मानणाऱ्या या देशातील अनेकांनी पैशाच्या लोभापायी ‘त्या’ घटकांचा खून करायला मागेपुढे पाहिले नाही.त्यात अनेकांना आपले वडील,अनेकांना आपली आई,बहीण,भाऊ,मुलगा,आपला प्रियजन गमवावा लागला आहे.याचे दुःख पहाडाएवढे होते यात शंकाच नाही.त्याला काही बोटावर मोजण्याईतके अपवाद होते नाही असे नाही पण ते नाममात्र.अशीच दुर्दवी वेळी नगर येथील कॉन्ट्रॅक्टर अशोक खोकराळे यांच्यावर आलेली आहे.त्यांचे पिताश्री बबनराव खोकराळे यांना घशाचा खवखविचा काही त्रास जाणवू लागला असता त्यांनीं त्यांना अ.’नगर कोविड सेंटर मनमाड रोड सावेडी येथे भावासोबत तपासणी करण्यासाठी डॉ.सचिन पांडोळे यांना फोन करून पाठवून दिले.दुसऱ्या दिवशी वडिलांना घरी सोडतो सांगून डॉ.सचिन पांडोळे,डॉ.गोपाळ बहुरूपी,डॉ.सुधीर बोरकर आदींनी अशोक खोकराळे व इतर नातेवाईकांना कुठलीही कल्पना न देता दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी न्यूक्लिअस हॉस्पिटल बालिकाश्रम रोड सावेडी येथे वडील बबनराव खोकराळे यांना हलवले.दुर्दैवाने दि. १८ ऑगस्ट २०२० रोजी बबनराव खोकराळे यांचा न्यूक्लिअस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.वडिलांच्या मृत्यू नंतर अशोक खोकराळे यांना अहमदनगर कोविड सेंटर आणि न्यूक्लिअस हॉस्पिटल यांनी बबनराव खोकराळे यांच्यावर उपचार केलेल्या सर्व नुक्त्या दिल्या.यानंतर अशोक खोकराळे यांनी वडिलांवर योग्य उपचार झालेत कि नाही या करिता काही त्यांच्या ओळखीच्या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना भेटून त्या उपचार केलेल्या नुक्त्या दाखवल्या असतां त्यांना धक्काच बसला आहे.त्यांच्या वडिलांवर अतिशय चुकीचे उपचार झालेले आढळले आहे.मयतास कोरोना नसताना कोरोना वर केलेले आढळले आहे.वडिलांच्या मृत्यूस वरील दोन्ही हॉस्पिटल मधील डॉक्टर्स जबाबदार असल्याचे धक्कादायक माहिती समजल्याने ते चक्रावून गेले होते.अशोक खोकराळे यांनी तत्काळ जिल्हा चिकित्सक,आयुक्त मनपा,महाराष्ट मेडिकल कॉन्शिल,आरोग्य मंत्री अशा अनेक ठिकाणी वरील हॉस्पिटल विरुद्ध तक्रार दाखल केली होत्या मात्र या गंभीर प्रकरणात कोणालाही दखल घ्यावी वाटली नाही हे विशेष !

या प्रकरणात त्यांनी सखोल चालू केली असता त्यांना या प्रकरणाशी संबंधित लॅब व वैद्यकीय उपचार करणारे दोषी आढळले आहे.त्यात
दि.१३ ऑगस्ट २०२० व दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजीचे कृष्णा लॅब विवाद घाट,विखे पाटील हॉस्पिटल येथे असे दोन कोरोना आर.टी. पी.सी.आर.तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सदर अहवाल व बिलावरील मोबाईल नंबर अनओळखी असल्यामुळे तक्रारदार खोकराळे यांनी सदर दोन्ही नंबर वर फोन करून विचारपूस केली असता एक योगेश उन्हाळे आणि दुसरा राजू सावंत यांचे ते अहवाल असल्याचे ध्यानी आले.त्यावरून तक्रारदार यांनी त्या अहवालाची खातरजमा केली असता ते अहवाल अन्य कोणातरी इसमाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.व वडिलांचे बनावट अहवाल तयार करून आपल्याला फसवले गेले असल्याचे समजले आहे.त्यानुसार त्यांनी औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे येथे दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल केला आहे.त्यात त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या न्यूक्लिअस हॉस्पिटल बालिकाश्रम रोड येथील डॉ.गोपाळ बहुरूपी,डॉ.सुधीर बोरकर तसेच अहमदनगर कोविड केअर सेंटर मनमाड रोड सावेडी येथील डॉ.पांडोळे आणि इतर तसेच ग्लोबस पॅथॉलॉजि अँड इम्युनोअसे लॅब बालिकाश्रम रोड येथी डॉ. मुकुंद तांदळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.मात्र त्या गुन्ह्यानंतर वर्षभर पाठपुरावा करून सुद्धा कुठेही प्रगती झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यामुळे त्यांनी नसल्यामुळे तक्रारदार यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन निळवंडे कालव्यांची याचिका मार्गी लावणारे प्रसिद्ध वकील अड्.अजित काळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे.
औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगर कोविड केअर सेंटर चे डॉ.सचिन पांडुळे,डॉ.अक्षदीप झावरे,डॉ.पटारे आणि इतर तसेच न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ.गोपाल बहुरूपी,डॉ.सुधीर बोरकर आणि ग्लोबस पॅथॉलॉजि अँड इम्युनोअसे लॅब चे डॉ.मुकुंद तांदळे यांना नुकत्याच नोटीस बजावल्या आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.यात राजकीय महाभागांच्या संस्थांचा सहभाग असल्याने कारवाई झाली। नाही हे उघड आहे.त्यामुळे या ठिकाणी खरोखरच उपचार होतात का ? असाही गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना,”माझ्या वडिलांच्या मृत्यू जे कोण्ही जबाबदार असतील त्यांच्याशी हा माझा कायदेशीर लढा आहे आणि हा कायदेशीर लढा आपण न्याय मिळेपर्यंत व दोषींना कायदेशीर कारवाई मिळेपर्यंत सुरु ठेवणार आहे.असे सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close