जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

साई संस्थानच्या अध्यक्षाची बनावट तक्रार,पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षांविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून याचिका कर्त्याला बदनाम करण्यासाठी बनावट सहीने त्यांच्याच नावाने बनावट तक्रार करून तक्रारदाराला बदनाम करण्यासाठी काही पत्रव्यवहार करून त्या बाबत उच्च न्यायालयासमोर तक्रार दाखल केल्या प्रकरणी त्या सहिला हरकत घेत याचिकाकर्ते उत्तम शेळके यांनी हरकत घेतली व गुन्हा दाखल केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने बनावट तक्रार करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

सदर बनावट तक्रार प्रकरणी कान्हुराज बगाटे,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,शिवाजी गोंदकर,नितीन कोतें व कैलास कोते यांची चौकशी करावी व सर्व तक्रार कोणी बनवल्या व कोणाच्या सांगण्यावरून बनवल्या व तक्रारीसोबत जोडलेले कागद कोणी व कसे दिली याची चौकशीची मागणी शेळके यांनी केली आहे.दरम्यान या प्रकरणी प्रवरा काठच्या राजकारणातील एक बडी हस्ती गुंतली असल्याचे समजते त्यामुळे या सूनावणीकडे राज्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”शिर्डी येथील संस्थानचे माजी विश्वस्त उत्तम शेळके यांनी साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयाने नवीन विश्वस्त शासनामार्फत नियुक्त करेपर्यंत प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त विभागीय आयुक्त,नासिक व सह धर्मादाय आयुक्त,अहमदनगर यांची तदर्थ समिती गठित करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार ०९ ऑक्टोबर २०१९ च्या आदेशान्वये दिले होते. सदर समिती ऑक्टोबर २०१९ पासून साईबाबा संस्थानचा कार्यभार सांभाळत असून उच्च न्यायालयाच्या परवानगीने धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेत आहे.

दरम्यान साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांच्या कारभाराबद्दल याचिकाकर्ते उत्तम शेळके यांच्या नावाने बनावट तक्रार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली होती.सदर तक्रार न्यायालयाची दिशाभूल व याचिकाकर्त्यांची व तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने केली असल्याचे शपथपत्र याचिकाकर्त्याने दाखल केले आहे.मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे अशा अजून हुबेहूब ३ तक्रारी शिर्डी येथील शिवाजी गोंदकर,नितीन कोतें व कैलास कोते यांनी देखील केल्या आहेत.सदर तक्रारीतील काही मुद्दे व कागदपत्रे गोपनीय असून सर्वसामान्यांना मिळणे अशक्य आहे,काही कागदपत्रे व मुद्दे न्यायप्रविष्ट विषयाबद्दल आहे.प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर व साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील व्हाट्सअँप संदेश देखील सदर तक्रारीबरोबर जोडले आहे.सदर व्हाट्सअँप संदेश त्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणाकडे मिळणे अशक्य असताना तसे संदेश तक्रारी बरोबर जोडले आहेत.

याचिकाकर्ते यांनी सदर बनावट तक्रारींवर त्यांची बनावट सही करून गंभीर गुन्हा केल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाणे येथे दिली होती.त्यात उत्तम शेळके यांनी कान्हुराज बगाटे,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांच्या सांगण्यावरून इतर कोणी बनावट तक्रार केली असावी असा संशय व्यक्त केला आहे.सदर बनावट तक्रार प्रकरणी कान्हुराज बगाटे,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,शिवाजी गोंदकर,नितीन कोतें व कैलास कोते यांची चौकशी करावी व सर्व तक्रार कोणी बनवल्या व कोणाच्या सांगण्यावरून बनवल्या व तक्रारीसोबत जोडलेले कागद कोणी व कसे दिली याची चौकशीची मागणी शेळके यांनी केली आहे.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायायालयाचे न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.आर.जी.अवचट यांनी शिर्डी पोलिसांना उत्तम शेळके यांच्या नावे संस्थानच्या अध्यक्षाची बनावट तक्रार प्रकरणी त्यांनी शिर्डी पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारींवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.पुढील सुनावणी १९ मार्च २०२१ रोजी ठेवण्यात आली आहे.
सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड.प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहे तर शासनाच्या वतीने ऍड.डी.आर काळे काम पाहत आहे.
दरम्यान या प्रकरणी प्रवरा काठच्या राजकारणातील एक बडी हस्ती गुंतली असल्याचे समजते त्यामळे या सूनावणीकडे राज्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close