न्यायिक वृत्त
हाणामारीवरून एकास एक वर्षाची शिक्षा !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी असलेला फिर्यादी सुनील भिका शिरसाठ यांच्यात व भाऊ-भावजय आदिंत आपापसात भांडणे सुरू असताना आरोपी अमोल म्हसु शिरसाठ याने,”तुम्ही मला शिवीगाळ का करता ?”म्हणून केलेल्या मारहाणीच्या गुन्ह्याचा निकाल नुकताच लागला असून यातील आरोपी अमोल शिरसाठ यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी एक वर्षाची शिक्षा व तीन हजारांचा दंड ठोठावला आहे.या न्यायालयीन निकालाचे स्वागत होत आहे.

सदर सुनावणी संपल्यावर सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपी अमोल शिरसाठ यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी एक वर्षाची शिक्षा व तीन हजारांचा दंड ठोठावला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सुनील शिरसाठ (वय-३२) व त्यांचा भाऊ सोमनाथ शिरसाठ,भावजय मंगल शिरसाठ यांचेत आपापसात दिनाक २० सप्टेंबर २०२० रोजी रात्री ८.१५ वाजता जोरदार भांडणे सुरू होती.त्यावेळी फिर्यादी यांचा चुलत भाऊ अमोल शिरसाठ हा त्या ठिकाणी आला व म्हणू लागला की,”तुम्ही मला शिवीगाळ का करत आहेत”त्यावेळी फिर्यादी सुनील शिरसाठ हा त्यांस म्हणाला की,”आमचे आपापसात भांडणे सुरू आहे.त्यात तुझा काही संबंध नाही.तू मध्ये पडू नकोस”असे म्हणाल्याचा त्यास राग येऊन त्याने भवजयीला शिवीगाळ करत त्याच्या घरी जावून लाकडी काठी आणून आपल्या भावजयीस मारहाण करू लागला त्यावेळी फिर्यादी सुनील शिरसाठ हे मध्ये पडले असता त्याने त्याच्या हातातील काठीने व लाथाबुक्क्यांनी त्यास मारहाण करून डोक्यात काठी मारली होती व जखमी केले होते.सदर प्रसंगी फिर्यादी सुनील यांची आई मध्ये भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलाही लाथाबुक्क्यानी मारहाण केली होती व “माझ्या नादी लागला तर संपून टाकील” अशी जाताना धमकी दिली होती.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वी.कलम ३२३,३२४ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुध्द दोषारोपपत्र कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात दाखल केले होते.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली होती.
त्यावेळी सरकारी पक्षाचे वतीने अतिरिक्त न्या.भगवान पंडित याचे समोर अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.तर आरोपींच्या वतीने ऍड.यांनी युक्तिवाद केला होता.सदर सुनावणी संपल्यावर सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपी अमोल शिरसाठ यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी एक वर्षाची शिक्षा व तीन हजारांचा दंड ठोठावला आहे.या न्यायालयीन निकालाचे स्वागत होत आहे.