न्यायिक वृत्त
…’ त्या ” खून खटल्यातील आरोपी पोलिसांकडून अखेर जेरबंद !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्मवीरनगर जवळ सोयेल हरून पटेल याचा निघून खून केल्या प्रकरणातील अटक आरोपी मच्छिंद्र सोनवणे,योगेश जाधव,महेश कट्टे यांना नुकतीच चौदा दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली असताना आज आणखी एक आरोपी विकी गोपाळ परदेशी यास अटक केली असून त्यास कोपरगाव येथील पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी बी.डी.पंडित यांच्या समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान यातील पहिल्या तीन आरोपींना पोलीस कोठडी ठेवून चौदा दिवसांची न्यायिक कोठडीत रवानगी केली असताना शहर पोलिसांना आणखी एक यश मिळाले असून यातील आरोपी विकी गोपाळ परदेशी यास शहरातील एका ठिकाणाहून अटक केली आहे.त्यास शहर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख यांनी आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीआहे.
सदरच्या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,”मयत तरुण सोहेल पटेल व एका आरोपीच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा प्रमुख आरोपीस संशय होता.त्यावरून तो त्यांच्या मागावर होता.त्यातून यातील आरोपी मच्छीन्द्र सोनवणे यांने आपले सहकारी मित्र स्वप्नील गायकवाड,महेश कट्टे,विकी परदेशी व त्याचा अनोळखी मित्र,योगेश जाधव उर्फ योग्या आदींना एकत्र करत मयत सोहेल याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता.त्यातून रविवार दि.21 जुलै रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास प्रमुख आरोपी सोनवणे व अन्य एक यांनी त्यास आपल्या टाटा मॅजिक मध्ये (क्र.एम.एच.१५ ई ४७९५) घेऊन गेले होते.तर अन्य दोन मागवून आपल्या दुचाकीवरून घटनास्थळी आले होते त्यांनी एकत्र येऊन मयत सोहेल पटेल यास चाकू,लाकडी दांडके,लोखंडी खिळे असलेलालाकडी बांबू आदींनी कर्मवीर नगर मधील जावेद शेख यांच्या रिकाम्या प्लॉट मध्ये नेऊन गंभीर जखमी केले होते उपचारादरम्यान त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले होते.
दरम्यान यातील तीन आरोपी शहर पोलिसांनी अटक केले होते.त्यांची सात दिवसांची पोलीस कोठडी नुकतीच संपली होती त्यांना कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी बी.डी.पंडित यांच्या समोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यांची मुदत काल संपली होती.त्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी ठेवून चौदा दिवसांची न्यायिक कोठडीत रवानगी केली असताना शहर पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे.
यातील आरोपी विकी गोपाळ परदेशी यास शहरातील एका ठिकाणाहून अटक केली आहे.त्यास शहर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख यांनी आज न्या.बी.डी. पंडित यांचे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान अजून या घटनेतील दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.