जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

शेतजमीन कसण्यास हरकत,आरोपींस तीन महिन्यांची शिक्षा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  
    वैजापूर तालुक्यातील भग्गाव येथील फिर्यादीच्या ताब्यातील शेतजमीन कसण्यास व मशागतीस हिल्ला हकरत केल्याचे दाखल झालेल्या दाव्यात निकाल देऊनही आरोपी मथुराबाई कोपरे,योगेश कोपरे,मंगेश कोपरे व बाळू त्रिभुवन आदींनी त्यास अडथळा निर्माण केल्या प्रकरणी वैजापूर येथील दिवाणी न्यायालयाने वरील आरोपींना तीन महिने दिवाणी तुरुंगाची शिक्षा सुनावली असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.

  

वैजापूर दिवाणी न्यायालयाचा आदेश असताना आरोपी मथुराबाई कोपरे,योगेश कोपरे,मंगेश कोपरे,बाळू त्रिभुवन आदी इसमांनी आडदांडपणे ‘त्या’ हुकुमाचा अवमान केला होता.त्या विरोधात फिर्यादी शेतकऱ्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले होते.त्या विरुद्ध दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण न्यायालयाचे न्या.आर.एम.कराडे यांनी आरोपींना तीन महिने दिवाणी तुरुंगाची शिक्षा सूनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी व प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब त्रिभुवन,नवनाथ त्रिभुवन,दत्तू त्रिभुवन आदींच्या मालकीची भग्गाव या ठिकाणी गट क्रं.११३ मध्ये शेतजमीन आहे.त्यास वरील हिल्ला हरकतीस कोणी अडथळा आणू नये म्हणून आरोपी मथुराबाई कोपरे,मंगेश कोपरे,बाळू त्रिभुवन आदी विरुद्ध वैजापूर येथील दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा (क्रं.-३३०/२००९) दाखल केला होता.


   सदर दाव्यात दिवाणी न्यायालयाने दि.२१ एप्रिल २०१० रोजी वरील इसमांना फिर्यादी शेतकऱ्यांना हरकत करू नये यासाठी मनाई आदेश पारित केला होता.

   सदर मनाई आदेश असताना वरील इसमांनी फिर्यादी इसमांना शेतजमीन कसण्यास हरकत केली होती.म्हणून वैजापूर येथील दिवाणी न्यायालयात चौकशी अर्ज क्रं.६/२०१३ हा दाखल केला होता.न्यायालयाचा आदेश असताना वरील इसमांनी आडदांडपणे ‘त्या’ हुकुमाचा अवमान केला होता.त्या विरोधात फिर्यादी शेतकऱ्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले होते.त्या विरुद्ध दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण न्यायालयाचे न्या.आर.एम.कराडे यांनी आरोपींना तीन महिने दिवाणी तुरुंगाची शिक्षा सूनावली आहे.

   दरम्यान या दाव्यात बाबासाहेब त्रिभुवन,नवनाथ त्रिभुवन,दत्तू त्रिभुवन आदींच्या वतीने अड्.एम.यू.सय्यद यांनी काम पाहिले होते.या निकालाने न्यायालयाचा अवमान करणाऱ्या असामाजिक तत्वांस मोठा चाप बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close