न्यायिक वृत्त
ज्येष्ठांनी वैवाहिक खटल्यात मध्यस्थी करावी-न्या.पाटील

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जेष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाचा न्यायालयास मदत करुन हातभार लावावा,वैवाहिक खटल्यात मध्यस्थी करून सामोपचाराने तोडगा काढत पतीपत्नीतील वाद मिटविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले आहे.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा न्या.बी.एम.पाटील हे छायाचित्रात दिसत आहे.
सदर प्रसंगी तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचे वतीने आयोजित जनजागृती शिबिर प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष एम.पी.येवले,राष्ट्रवादीचे प्रवक्ते अड्.संदिप वर्पे आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे.
कोपरगाव न्यायालयात जेष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन,जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश बी.एम.पाटील हे होते.

सदर प्रसंगी व्यासपीठावर दिवानी न्यायाधीश महेश शेलार,दिवानी न्यायाधीश भगवान पंडित,जेष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले,उत्तम भाई शहा,महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी वसंत आव्हाड,डॉ. विलास आचारी,ह.भ.प.जगन्नाथ महाराज थोरे,पेंटर महंमद दारुवाला,सुवालाल भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचे वतीने आयोजित जनजागृती शिबिर प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष एम. पी.येवले,अड्.संदिप वर्पे व उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक एड.अशोक टुपके यांनी केले आहे.जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाताई ठोळे, उद्योजक कैलास ठोळे,मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर वकील संघाच्या महिला समितीच्या एड.ज्योती भुसे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.