नैसर्गिक आपत्ती
वादळी पावसाने घरासह गोठा उडाला,अद्याप पंचनामा नाही

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येस असलेल्या अंजनापूर,बहादरपूर,रांजणगाव देशमुख आदी परिसरात नूक्त्याच पडलेल्या मृगाच्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी अंजनापुर येथील शेतकरी यांचे घराचे छत व जनावरांचा गोठा उडून गेला असून त्याचा अद्याप कोणीही पंचनामा केला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस असलेल्या अकरा गावात दि.०९ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास या पावसाने सलामी दिली आहे.त्यात बहादरपूर,अंजनापूर,रांजणगाव देशमुख,संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे,भागवतवाडीआदी ठिकाणी हि सलामी दिली आहे.यात अंजनापूर येथील भाऊसाहेब अर्जुन गव्हाणे (वय-५०) या शेतकऱ्याच्या घराचे छत उडून गेले आहे.तर याशिवाय या परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे.हा पाऊस म्हणजे वळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो.यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.आता भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात चांगली बातमी दिली आहे.मान्सूनने आगेकूच सुरु केली आहे.
राज्यात मान्सून लवकरच दाखल होणार असल्याची गोड बातमी आली असताना कोपरगाव तालुक्यात वादळी पावसाने सलामीलाच धक्का दिला आहे.त्यातील कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस असलेल्या अकरा गावात दि.०९ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास या पावसाने सलामी दिली आहे.त्यात बहादरपूर,अंजनापूर,रांजणगाव देशमुख,संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे,भागवतवाडीआदी ठिकाणी हि सलामी दिली आहे.यात अंजनापूर येथील भाऊसाहेब अर्जुन गव्हाणे (वय-५०) या शेतकऱ्याच्या घराचे छत उडून गेले आहे.तर याशिवाय या परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली आहे.त्यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दरम्यान त्यात भाऊसाहेब गव्हाणे यांचे घराचे छत आणि जनावरांचा गोठा उडून गेला असून त्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे कि अद्याप कोणीही त्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केलेला नाही.त्या शिवाय महसूल वा ग्रामविकासचे साधे कनिष्ठ कर्मचारी,तलाठी आणि ग्रामसेवक आदींनी पंचनामा केला नाही.त्यामुळे त्यांचा प्रपंच उघड्यावर आला आहे.त्याबाबत तातडीने पंचनामा करावा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी केली आहे.