जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

अवकाळी नुकसान पाहणी बाबत…या नेत्यांचा दौरा संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी आज शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांच्या समवेत पाहणी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

“राहाता तालुक्यातील पिंपळस येथे द्राक्षे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पाहणी करून लवकरच मुख्यमंत्री यांच्याशी बोलून जास्तीत जास्त मदत मिळुन देऊ तसेच पीक विम्याबाबत देखील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील”-खा.सदाशिव लोखंडे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.

अ.नगर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात नुकत्याच झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल मंत्री विखे यांच्या समवेत नुकसान भरपाईच्या पाहणीसाठी पारनेर तालुक्यात भेट दिली आहे.अनेक भागात गारपीट झाल्याने जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील हरभरा,ज्वारी,गहू आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे आंब्याचेही नुकसान झाले असून गारपीटमुळे टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.त्याची पाहणी करण्यासाठी आज शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांनी पाहणी दौरा केला आहे.

सदर प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे पाटील,शहर प्रमुख सागर बोठे,भागीरथ कुदळे,ज्ञानेश्वर खापटे,युवराज चूळभरे,बाळासाहेब निरगुडे,केशव निरगुडे,बाळासाहेब कुदळे,अंबादास कुदळे,प्रकाश निरगुडे,बाळासाहेब विठ्ठल कुदळे,माई निरगुडे,संतोष कुदळे,ग्रामपंचायत सदस्य सागर कापसे,अरुण निरगुडे अनिल पवार,सोमनाथ कोते,चद्रकात गायकवाड व इतर शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान पिंपळस येथे द्राक्षे शेती चे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ह्या शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पाहणी करून लवकरच मुख्यमंत्री यांच्याशी बोलून जास्तीत जास्त मदत मिळुन देण्याचे आश्वासन खा,लोखंडे यांनी दिले आहे.तसेच पीक विम्या बाबत देखील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून पुढील कारवाई करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close