नैसर्गिक आपत्ती
शिर्डीचे खा.लोखंडे बेपत्ता,शेतकरी,पूरग्रस्त नागरिक वाऱ्यावर-टीका

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यासह कोपरगाव तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना त्याकडे लक्ष न देता दोन वेळा शिवसेना पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने दिल्लीला निवडून गेलेले व सध्या शिंदे गटाचे खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांना कोपरगाव तालुक्यातील जनतेचे काहीच देणे घेणे उरले नाही अशी प्रखर टीका कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
“नुकत्याच झालेल्या पावसाने कोपरगाव शहरातील बहुतांश उपनगरात अनेकांच्या घरात २ ते ४ फूट पाणी घुसून संसार उपयोगी वस्तूंचा वाटोळे झाले तर अनेकांनी आपल्या चिमुकल्यासह संपूर्ण रात्र जीव मुठीत धरून पाण्यात काढली तर शहरातील खंदकनाला व गोकुळनगरी पुलावरून पाणी वाहत असल्याने शहरात देखील पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे मात्र या आपत्कालीन स्थितीत शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे कुठेही दिसले नाही हे विशेष !-सुनील देवकर,माजी सभापती,कोपरगाव पंचायत समिती.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे गायब झाले असून त्यांचा ठावठिकाणा कोणालाही दिसत नाही.त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाव वाऱ्यावर सोडून दिले असल्याचे दिसत आहे.परतीच्या पावसाने मतदार संघात धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे.मात्र खा.लोखंडे कुठेही दिसत नाही त्यामुळे शेतकरी कोपरगावातील पूरग्रस्त नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.शेतकऱ्याचे खरीप पिके पाण्यात पोहत आहे. अनेकांची पिके पाण्यात वाहून गेली आहे.शेतकऱ्यास कोणीही वाली राहिले नाही असे दिसत आहे.
बुधवार दि.२० ऑक्टोबरच्या मध्यरात्री पुन्हा एकदा संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन उरली सुरली पिके देखील वाहून गेल्याने शेतकरी मोठा संकटात सापडला आहे तर दुसरीकडे याच पावसाने कोपरगाव शहरातील बहुतांश उपनगरात अनेकांच्या घरात २ ते ४ फूट पाणी घुसून संसार उपयोगी वस्तूंचा सर्वनाश झाला तर अनेकांनी आपल्या चिमुकल्यासह संपूर्ण रात्र जीव मुठीत धरून पाण्यात काढली तर शहरातील खंदकनाला व गोकुळनगरी पुलावरून पाणी वाहत असल्याने शहरात देखील पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे तर शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कांदा देखील पाण्यात पोहताना दिसून येत होता.
ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने आपल्या रौद्र अवताराने सर्वकाही नेस्तनाबूत केल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांना देखील दिवाळी सण साजरा करणे अवघड होऊन बसले आहेत तर व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा माल खरेदी करत आपली सजवलेली दुकानं ग्राहक नसल्याने ओस पडल्याने सर्वत्र शुकशुकाट असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे यांना या भयावह परिस्थितीची पाहणी करायला देखील वेळ मिळत नसल्याने ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल असे मत देवकर यांनी व्यक्त करत खा.लोखंडेंना कोपरगाव तालुक्याचे काही देणेघेणे नाही असेच त्यांच्या वर्तनातून दिसत असल्याचेही दिसत असल्याचे देवकर यांनी शेवटी म्हटले आहे.