निवड
रयतच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी…यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर विभागीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांची वर्णी लावली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
“बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार स्पर्धेच्या युगात रयतचा विद्यार्थी कुठेच कमी पडणार नाही याची काळजी घेवू.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून माझी वाटचाल अशीच सुरु राहणार असून संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड संपन्न झाली आहे.त्यात मागील तीन वर्ष ज्यांच्यावर जाबाब दारी होती त्या आ.काळे वर पुन्हा एकदा हि जबाबदारी सोपवली आहे.त्यांच्या निवडीचे कोपरगाव तालुक्यातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदन होत आहे.