निवड
विद्यापीठ अनुदान आयोग परीक्षा,विद्यार्थिनींचे लक्षवेधी यश,सर्वत्र कौतुक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी व संगमनेर शहरातील भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक गोरक्षनाथ जयराम थोरात यांची कन्या कु.सृष्टी थोरात हिने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षेत ९९.६२ टक्के गुण मिळवून बाजी मारली आहे.तिच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात यू.जी.सी.परीक्षा संपन्न झाल्या होत्या.त्याचे निकाल नुकतेच हाती आले आहेत.त्यात कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील मूळ रहिवासी असलेले प्रा.गोरक्षनाथ थोरात यांची कन्या कु.सृष्टी थोरात हीच समावेश होता.या परीक्षेत तिने विशेष श्रेणीत ९९.६२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून डिसेंबर-२०२१ आणि जून-२०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांना विलंब झाला होता.त्यामुळे आता नेट ही परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टप्प्या टप्प्याने घेण्यात आल्या होत्या.नेट ही परीक्षा पदवीत्तर झाल्यानंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ही परीक्षा देत असतात.वरिष्ठ महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधक सहाय्यक फेलोशिपसाठी ही परीक्षा दिली जाते.
त्या जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात सदर परीक्षा संपन्न झाल्या होत्या.त्याचे निकाल नुकतेच हाती आले आहेत.त्यात कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील मूळ रहिवासी असलेले प्रा.गोरक्षनाथ थोरात यांची कन्या कु.सृष्टी थोरात हीच समावेश होता.या परीक्षेत तिने विशेष श्रेणीत ९९.६२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.दरम्यान कु.सृष्टी थोरात हिचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण संगमनेर येथे झाले असून उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण संगमनेर आणि पुणे येथे झाले आहे.
दरम्यान तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य दीनानाथ पाटील,प्रा.शिवाजी नवले,आदींसह निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,उपसरपंच विजय थोरात,सदस्य प्रकाश थोरात,रावसाहेब सु.थोरात,नवनाथ थोरात,डी.के.थोरात,डॉ.भाऊसाहेब थोरात,आदींनी अभिनंदन केले आहे.