निवड
कोपरगावातील…या महिलेस,’सौर ऊर्जा क्षेत्रातील पुरस्कार’ प्रदान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सोलर रुफटॉप इंस्टॉलेशन या क्षेत्रात मागील पाच वर्षांपासून काम करणाऱ्या उद्योजिका मनीषा आनंद बारबिंड यांना नुकताच,’वूमन ऑफ इयर इन रुफटॉप सोलर फॉर महाराष्ट्रा’ हा पुरस्कार पुणे येथील ‘हॉटेल हयात इंटरनॅशनल’ येथे सूर्याकॉन कॉन्फरेन्स अँड महाराष्ट्रा सोलर अवॉर्डस-२०२३ या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सौर ऊर्जा क्षेत्रातील ‘ई.क्यु.इंटरनॅशनल’ या कंपनीने सौर ऊर्जा तज्ञांना निमंत्रित एका चर्चासत्राचे आयोजन केले होते व सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या विविध यशस्वी कंपन्या आणि व्यक्तीस त्यांच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.त्यात कोपरगाव येथील रहिवासी व सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या मनीषा बारबिंड यांना हा गौरव प्राप्त झाला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सौरऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळवलेली ऊर्जा.सूर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे.ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीत वाढेल आणि सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही.त्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते,मात्र हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी बऱ्याच संशोधनाची आवश्यकता आहे.अपारंपारिक आणि विशेषतः सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनावरील निधी तसेच जागरूकता दिवसेंदिवस वाढत आहे.त्या साठी सरकारसह विविध खाजगी संस्था प्रोत्साहन देत असून त्यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे.त्यासाठी विविध संस्था या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा गौरव करत असते.
सौर ऊर्जा क्षेत्रातील ‘ई.क्यु.इंटरनॅशनल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद गुप्ता यांनी तज्ञांना निमंत्रित करून चर्चासत्राचे आयोजन केले होते व सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या विविध यशस्वी कंपन्या आणि व्यक्तीस त्यांच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.त्यात कोपरगाव येथील रहिवासी व सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या मनीषा बारबिंड यांना हा गौरव प्राप्त झाला आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते व ‘ए टू झेड एनर्जी’चे कार्यकारी संचालक डॉ.प्रशांत खामखोजे,महावितरण कंपनीचे पुणे येथील प्रशासकीय अधिकारी जयंत कुलकर्णी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.मनीषा बारबिंड याचे सर्वत्र कौतुक होत आहे.