निवड
पत्रकार पवार ‘विभागीय’ पुरस्काराने सन्मानीत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पत्रमहर्षी स्व.मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले असून यात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कोपरगाव तालुक्यातील घारी येथील पत्रकार किसन पवार यांना,’पश्चिम महाराष्ट्र विभागीय पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पत्रकार किसान पवार हे गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्रांमध्ये कोपरगाव तालुक्यातील पत्रकारिते सोबतच सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,कृषी यासह विविध क्षेत्रात वृत्तपत्राच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राजकीय,सामाजिक,कला,क्रीडा,सांस्कृतिक,धार्मिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील विविध प्रश्नावर अभ्यासपूर्ण लिखाण करून आपल्या पारदर्शक अभ्यासू पत्रकारितेचा ठसा पवार यांनी उमटविला आहे.
याची दखल घेत पश्चिम महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना विभागीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी त्यांच्या धर्मपत्नी ज्योती पवार यांचे सह राज्यस्तरीय पत्रकारिता विशेष गौरव पुरस्कार सोहळ्याला दै. ‘मराठवाडा साथी’ चे संपादक जगदीश बियाणी,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,बाजीराव खांदवे,केशव काळे,गोदावरी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष होन,चांदेकसारे चे सरपंच किरण होन,कर सल्लागार काकासाहेब पवार,पुणे येथून सॅवील प्रॉपर्टी सर्विसेसचे संचालक योगेश पवार,विधीज्ञ नितीश पवार,प्राजक्ता पवार, आशिष पवार,राजेंद्र होन,रावसाहेब होन,मनोहर होन,अर्जुन होन,धीरज बोरावके,छत्रपती संभाजी नगर येथील उद्योजक जनार्दन लांडे,राजेंद्र निंबाळकर,पोहेगाव येथील मुकुंद औताडे,प्रतिभा औताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार किसान पवार हे गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्रांमध्ये कोपरगाव तालुक्यातील पत्रकारिते सोबतच सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,कृषी यासह विविध क्षेत्रात वृत्तपत्राच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांनी केले सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी तर जगदीश बियाणी यांनी आभार मानले.