निवड
…या शिक्षकाची,’राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारा’साठी निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालय तसेच शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी संवत्सर येथील रहिवासी व सध्या नाशिक येथील ई.एम.आर.एस.शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुनील केशवराव भाकरे यांची निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सुनील भाकरे यांनी शिक्षकी कामकाज सांभाळताना संवत्सर व बाहेरील असंख्य विद्यार्थ्यांना घडविले असून या क्षेत्रात त्यांनी नांवलौकीक मिळविलेला आहे.वेगवेगळा संशोधनासह विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी अनेक उपयुक्त असे उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत.या कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या जनजातीय मंत्रालय व शिक्षण विभागाने त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड केली आहे.
नवी दिल्ली येथे भारत सरकारचे जनजातीय कार्य मंत्रालय तसेच नॅशनल सोसायटी फॉर सायबर स्टुडंटस् एज्युकेशन नेस्टच्यावतीने श्री भाकरे यांचा विशेष मानपत्र व २५ हजार रुपये रोख रक्कम देऊन नुकताच गौरव करण्यात आला.या गौरव सोहळ्यासाठी आयुक्त असित गोपाल,सहआयुक्त के.सी.मीणा,सहआयुक्त बिपीन रतोडी,सहाय्यक आयुक्त श्रीमती इंदिरा मुदगल आदी मान्यवर उपस्थित होते.श्री भाकरे यांनी शिक्षकी कामकाज सांभाळताना संवत्सर व बाहेरील असंख्य विद्यार्थ्यांना घडविले असून या क्षेत्रात त्यांनी नांवलौकीक मिळविलेला आहे.वेगवेगळा संशोधनासह विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी अनेक उपयुक्त असे उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत.या कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या जनजातीय मंत्रालय व शिक्षण विभागाने त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड केली आहे.
शिक्षक सुनील भाकरे हे संवत्सर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै.केशवराव भाकरे यांचे चिरंजीव आहेत.या पुरस्काराबद्दल राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे,खा.डॉ.सुजय विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उप सरपंच विवेक परजणे,पत्रकार शिवाजी गायकवाड,बाळासाहेब दहे आदिंनी अभिनंदन केले आहे.