जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावातील दोघांची ‘पोलीस उपनिरीक्षक’पदी बढती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलाने सहाय्यक उपनिरीक्षक पदाची नुकतीच पदोन्नती दिली आहे.त्यात कोपरगाव येथे सेवा बजावले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवा बजावलेले एस.सी.पवार यांची व कोपरगावात सेवा बजावल्यानंतर नेवासा येथे बदली झालेले शैलेंद्र गंगाधर ससाणे यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या बढत्या देण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार आतापासून पोलीस हवालदारांना पोलीस नाईक ऐवजी थेट हेड कॉन्स्टेबल पदावर बढती दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

यात हेड कॉन्स्टेबलना वीस वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) म्हणून पदोन्नती दिली जाईल.तर तीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर ते पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी पात्र होतील असे जाहीर केले होते.

वर्तमान व्यवस्थेत दहा वर्षांच्या सेवेनंतर हवालदाराला पोलीस नाईक आणि वीस वर्षांच्या सेवेनंतर हेड कॉन्स्टेबल म्हणून बढती मिळते.तीस वर्षांहून अधिक सेवा केल्यानंतर त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) म्हणून बढती मिळते.कॉन्स्टेबलना पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) या दर्जाची पदोन्नती मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल.या पद्धतीने पोलीस कॉन्स्टेबल पदाला पदोन्नती मिळाली आहे.त्यामुळे पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

नूतन उपनिरीक्षक पदावर निवड झालेले शैलेंद्र ससाणे यांचे मूळ गाव राहुरी हे आहे.सेवेची सुरुवात जानेवारी १९९० या नगर ठिकाणी १९९१ ते १९९७ श्रीरामपूर शहर १९९७ ते २००२ अकोले,२००२ ते २००७ राहुरी,२००८ ते २०१४ पर्यंत कोपरगाव,२०१५ ते २०१६ जामखेड २०१८ त्या नंतर २०१९ ते २०२१ कोपरगाव शहर,२०२१ ते २०२२ नेवासा आदी ठिकाणी काम केले होते.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रुजू असलेले एस.सी.पवार हे नगर जवळील पिंपळगाव लांडगा येथील मूळ रहिवासी असून त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात १६ जानेवारी १९९० रोजी रामटेकडी पुणे येथे केली आहे. तर त्या नंतर त्यांची नगर येथे २००७ ला बदली झाली होती.त्यानंतर २००८ ते २०१५ पर्यंत कोतवाली पोलीस ठाणे येथे आपले कर्तव्य बजावले आहे.२०१६ ते २०२१ कोपरगाव तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी आपली सेवा दिली होती.व शेवटी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात २०२१ पासून आहे.

त्यांचे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोम्बरे,भरत दाते आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close