जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावातील..या शिक्षकास ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

नाशिक येथील क्रीडा संस्कृती फाऊंडेशन आयोजित राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा हाॕकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचे चिरंजीव,अर्जुन पुरस्कार प्राप्त अशोक ध्यानचंद यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला.यामध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांना हा पुरस्कार अशोक ध्यानचंद यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

सन-२०२०-२०२१ पासुन श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाच्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी कोरोना काळात देखिल आॕनलाईन शिक्षण विशिष्ट पध्दतीने सुरुच ठेवले.विविध क्रीडा व शैक्षणिक विषयावर विविध माध्यमातुन लिखाण देखिल केले आहे.यापुर्वी त्यांना क्रीयाशिल विज्ञान शिक्षक व आदर्श क्रीडा शिक्षक हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

त्या प्रसंगी छत्रपती पुरस्कार विजेते व महाराष्ट्र आँलिंपिक असो.सदस्य अशोक दुधारे,मुंबई हाॕकी असोसीएशनचे सचिव रणबिरसिंग,सदस्य रणजित सिंग,टेनिस व्हाॕलीबाॕल असोसीएशनचे उदय खरे,दीपक निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

मकरंद को-हाळकरसर हे जुन ९१-९२ पासुन क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असुन त्यांनी क्रीडा शिक्षक म्हणून काम करतांना विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन यशस्वीपणे केले आहे.तसेच क्रीडा शिक्षक म्हणून काम करताना अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडु घडविले आहेत.विविध खेळाच्या राष्ट्रीय व राज्य संघटनेवर ते कार्यरत असून विदयालयांत विज्ञान शिक्षक म्हणून काम करतांना जिल्हा विज्ञान व तालुका विज्ञान संघटनेत त्यांनी काम केले आहे.राज्य व जिल्हा विज्ञान प्रदर्शन मध्ये विदयालयातील विविध विद्यार्थीना मार्गदर्शन केले आहे.

श्री को-हाळकर यांना हा पुरस्कार मिळाल्या मिळाल्या बद्दल कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संदीप अजमेरे,विदयालयाचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड,जेष्ठ शिक्षिका यु.एस.रायते मॅडम,श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे संपूर्ण परीवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close