जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगाव पूर्व तालुक्यातील…या वि.का.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतीनिधी)

संवत्सर येथील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नामदेवराव परजणे पाटील विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विवेक कृष्णराव परजणे यांची तर उपाध्यक्षपदी अविनाश पंढरीनाथ गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अध्यक्षपदासाठी विवेक परजणे यांच्या नांवाची सूचना राजेंद्र भोकरे यांनी मांडली त्यास बबन परजणे यांनी अनुमोदन दिले.तर उपाध्यक्षपदासाठी अविनाश गायकवाड यांच्या नांवाची सूचना सोमनाथ घेर यांनी मांडली तर त्यास ज्ञानेश्वर कासार यांनी अनुमोदन दिले.या निवड प्रक्रियेसाठी सहाय्यक म्हणून भानुदास वाकचौरे यांनी सहकार्य केले आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे राजेश परजणे यांनी अभिनंदन केले आहे.

संवत्सर येथील संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एन.जी.ठोंबळ यांनी काम पाहिले आहे.

सदर प्रसंगी गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, लक्ष्मणराव साबळे,खंडू फेपाळे,लक्ष्मणराव परजणे,चंद्रकांत लोखंडे,गणपत रानोडे यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य विवेक परजणे,ज्ञानेश्वर कासार,सोमनाथ घेर,बबन परजणे,बाळासाहेब बोरनारे,राजेंद्र भोकरे,विठ्ठल लोखंडे,बबनराव भाकरे,कल्पना अशोक कर्पे,सुरेखा रमेश निरगुडे, अविनाश गायकवाड,राजेंद्र तिरमखे,सुभाष डरांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी अध्यक्षपदासाठी विवेक परजणे यांच्या नांवाची सूचना राजेंद्र भोकरे यांनी मांडली त्यास बबन परजणे यांनी अनुमोदन दिले.तर उपाध्यक्षपदासाठी अविनाश गायकवाड यांच्या नांवाची सूचना सोमनाथ घेर यांनी मांडली तर त्यास ज्ञानेश्वर कासार यांनी अनुमोदन दिले.या निवड प्रक्रियेसाठी सहाय्यक म्हणून भानुदास वाकचौरे यांनी सहकार्य केले.

नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी विरोधी पक्षनेते आ.राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,खा.डॉ.सुजय विखे,कृष्णराव परजणे,राजेश परजणे आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close