निवड
सिंधी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी…यांची निवड !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव सिंधी समाज महिला मंडळ अध्यक्षपदी “कशिश शर्मा” यांची मोठ्या उत्साहात निवड करणेत आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यावेळी नुतन अध्यक्ष कशिश शर्मा यानी येणाऱ्या काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतील असा मानस शेवटी व्यक्त केला आहे.
कोपरगांव-सिंधी समाजाचे इष्टदेवता भगवान झुलेलाल अर्थातच वरुणदेव यांची जयंती कोपरगाव शहरात नुकतीच मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.सदर प्रसंगी कोपरगाव शहर सिंधी समाज महिला मंडळाची नुतन कार्यकारणी पुढील दोन वर्षांसाठी जाहिर करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते कशिश विकी शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.याशिवाय उपाध्यक्षपदी-वर्षा दिपक आर्य,सचिव-गुंजन राम आर्य,सहसचिव-कीर्ति शाम कॄष्णाणी,खजिनदार-दिव्या गोपी शर्मा व सह खजिनदार-आंचल सुंदर आर्य यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान मावळत्या अध्यक्षा सिमरन खुबाणी यानी त्यांच्या कारकिरदित केलेल्या कार्याचा आढावा दिला.तर महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा शालिनी खुबाणी यानी नुतन कार्यकारणीचे अभिनंदन केले आहे.यावेळी नुतन अध्यक्ष कशिश शर्मा यानी येणाऱ्या काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतील असा मानस शेवटी व्यक्त केला आहे.