निवड
…या डॉक्टरांना मिळाली आंतरराष्ट्रीय फेलोशिप !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता येथील प्रसिद्ध मूळव्याध व पोटविकार तज्ञ डॉ.किरण गोरे यांना इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कोलोप्रॉक्टोलॉजी असोसिएशन तर्फे ‘फेलोशिप इन इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कोलोप्रॉक्टोलॉजी’ ही पदवी देऊन गौरवलं असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.त्यांचे नगर जिल्ह्यासह राहाता,कोपरगाव तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे.

“आपल्याला मिळालेली ‘इंटरनॅशनल फेलोशिप’ हा पुरस्कार म्हणजे आपण केलेल्या चांगल्या कार्याची पावती असून त्या परिषदेत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आगामी काळात पीडित रुग्णासाठी करणार आहे”-डॉ.किरण गोरे,संचालक,साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,राहाता.
मूळव्याध हा मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना होणारा एक आजार आहे.बदलता आहार आणि आपली बदललेली जीवनशैली ही याची मुख्य कारणं आहेत.नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील एकूण लोकांपैकी पन्नास टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीनाकधी याचा त्रास होतो.यातील पाच टक्के लोकांना याचा त्रास कायमस्वरुपी राहातो.या आजाराच्या उपचाराबाबत नगर जिल्ह्यात अलीकडील प्रसिद्ध नाव म्हणजे ‘साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चे संचालक डॉ.किरण गोरे हे आहेत.त्यांनी शेकडो नव्हे तर हजारो रुग्ण ‘मूळव्याध’ आणि ‘फिशर’च्या वेदनेतून मुक्त केले आहे.आजही त्यांची ही सेवा अव्याहत सुरू असून नाशिक,संभाजीनगर,अहील्यानगर,धुळे आदी जिल्ह्यातून रुग्ण आपल्या आजारातून मुक्तता मिळविण्यासाठी येत आहे.त्यांची दखल कोची येथील आरोग्य परिषदेत नुकतीच घेतली असल्याची माहिती कोची येथील संस्थेने प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान या कोची येथे आयोजित केलेल्या या परिषदेत अमेरिका,युरोप,कैरो,इंडोनेशिया,सिंगापूर,रशिया,मोरोक्को सह भारतातील प्रसिद्ध पोट विकारतज्ञ उपस्थित होते.या परिषदेत भारतातील पोट विकार,आतड्याच्या कॅन्सर,अल्सर,बद्धकोष्ठता,मूळव्याध,फिशर,फिस्तुला,पिलोनिडल ,सिनुस आदींवर उपचार करणारे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर जगभरातून उपस्थित होते.त्यांच्यात चर्चा होऊन डॉ.किरण गोरे यांना ‘इंटरनॅशनल फेलोशिप’ देण्यात आली आहे हे विशेष ! हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या केलेल्या चांगल्या कार्याची दखल व पावती असून त्या परिषदेत मिळालेल्या ज्ञानाचा आगामी काळात पीडित रुग्णासाठी उपयोग होणार असल्याची माहिती डॉ.किरण गोरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.