जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

रांधवणे यांची…या पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

जाहिरात-9423439946

युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष आपला पक्ष वाढविण्याच्या प्रयत्नास लागले असून राष्ट्रवादी शरद पवार गटही अपवाद नाही या पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड.संदीप वर्पे यांनी नुकतीच कोपरगाव तालुका अध्यक्षपदी गोधेगाव येथील कार्यकर्ते बापू रांधवणे यांची निवड केली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  

मध्यंतरी ईशान्य गडावरील युवराजाने शरद पवार यांच्या गाडीत वारी केली असल्याची बातमी प्रसिद्ध झाली (मुद्दाम केली) होती.मात्र त्यांनी तालुक्यात आपली बार्गेनिंग पावर वाढविण्यासाठी युक्ती केली असल्याची बामतीअसून,”कही पे आंख कही पे निशाणा” लावल्याची नवी बातमी हाती आली आहे.

  २०२४ हे वर्ष लोकसभा निवडणुकीचे होते.लोकसभेनंतर आता काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्याचा समावेश आहे.या दोन्ही राज्याच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे.महाराष्ट्रातील विधानसभेत २८८ जागा असून हरियाणामध्ये ९० जागा आहेत.या दोन्ही राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे.महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.तर हरियाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असते.त्यामुळे या दोन्ही राज्यात दिवळीनंतर निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.विशेष म्हणजे या दोन्ही राज्यात २००९ पासून एकत्र निवडणुका होत आहेत.दोन्ही राज्यातील विधानसभेची मुदत संपण्यात फक्त २३ दिवसांचे अंतर आहे.त्यामुळे या दोन्ही राज्यात सर्वच पक्ष कामाला लागले आहे.लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला मोठे यश मिळाले असल्याने त्यांच्या शिडात हवा घुसली आहे.तर भाजप महायुती आता ताक ही फुंकून पिताना दिसत आहे.दोन्ही गटात आता पक्ष पदाधिकारी निवडींना वेग आला आहे.त्याला शरद पवार राष्ट्रवादी गटही अपवाद नाही.त्यांनी नगर जिल्ह्यात पक्ष बांधणी जोरात सुरू केली आहे.त्यात कोपरगाव तालुका त्यास अपवाद नाही.
   कोपरगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी ज्येष्ठ पवार गटाचे कार्याध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांनी आपल्या पक्ष बांधणीस जोर लावला आहे.आधी त्यांनी युवकची बांधणी केली असून आता त्यांनी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पदाची निवड घोषित केली आहे.त्यात त्याने गोधेगव येथील कार्यकर्ते बापू रांधवणें यांना संधी दिली आहे.विधानसभा निवडणुकीस ते स्वतः इच्छुक असून त्यांनी तशी मोर्चे बांधणी केली आहे.मध्यंतरी ईशान्य गडावरील युवराज यांनी शरद पवार यांच्या गाडीत वारी केली असल्याची बातमी प्रसिद्ध झाली (मुद्दाम केली) होती.मात्र त्यांनी तालुक्यात आपली बार्गेनिंग पावर वाढविण्यासाठी युक्ती केली असल्याची बामतीअसून,”कही पे आंख कही पे निशाणा” अशी सोय केली असल्याची नवी बातमी हाती आली आहे.त्यासाठी त्यांनी नाटक केले असल्याचे बोलले जात आहे.मात्र त्यांनी मशाल हाती घेण्याचे ठरवले असल्याने आता कोपरगाव विधानसभेसाठी संदीप वर्पे यांची संधी वाढली असल्याचे बोलले जात आहे.त्यांची ओळख शरद पवार यांचे निष्ठावान अशी राहिली आहे.त्यामुळे आता आगामी काळात ते जोरात सक्रिय झाले असल्याचे मानले जात असून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे समजते.

   राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी गोधेगाव येथील प्रगतीशील शेतकरी बापू रांधवणे यांना नियुक्ती  केल्याबद्दल माजी राज्यमंत्री आ.प्राजक्त तनपुरे,पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे,ओ.बी.सी सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष राहुल राऊत,संतोष वढणे,ॲड.रमेश गव्हाणे,सुरेश आसने,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सुनील वर्पे,ऋतुराज काळे आदीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close