निवड
तालुक्यातील …या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या गणल्या जाणाऱ्या वडगाव येथील वडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या संचालक व पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली असून अध्यक्षपदी सर्जेराव केदू सांगळे यांनी तर उपाध्यक्षपदी अशोक महादू डोंगरे यांनी बहुमताने निवड झाली आहे.नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सहकार विभागातील अधिकारी,कर्मचारी यांच्या सेवा संबंधित जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहीत केल्या होत्या.तसेच सहकार विभागातील तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकारी,कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.त्यामुळे निवडणुकीला पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठविण्यात आली असून,१० जूनपासून राज्यातील सुमारे ३९ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यात कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथील सेवा संस्था सामील होती.त्यांची निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून त्यांच्या या निवडणुकीत सर्वसाधारण जागेवर गोरक्ष यादव सानप,सुभाष रावबा डोंगरे,गोपीनाथ सुलाजी केदार,विष्णू धर्मा सानप,अशोक महादू डोंगरे,सुरेश दळपत कांगणे,प्रभाकर भाऊसाहेब कांगणे,राजेंद्र एकनाथ सोनवणे,आदी निवडून आले होते तर भटक्या विमुक्त जाती त सर्जेराव केदु सांगळे,महिला राखीव मतदार संघात कमलबाई भागवत सोनवणे,मालती बाबासाहेब कांगणे यांची तर अनुसूचित जमातीसाठी लहानु दगडु माळी यांनी संचालक पदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती.
दरम्यान या निवडी नंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.त्यात अध्यक्षपदासाठी सर्जेराव सांगळे यांच्या नावाची सूचना सुरेश कांगणे यांनी केली होती.तर उपाध्यक्ष पदासाठी अशोक डोंगरे यांच्या नावाची सूचना प्रभाकर कांगणे यांनी केली होती.त्यास अनुमोदन गोपीनाथ केदार यांनी दिले होते.
दरम्यान या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी आर.एन.रहाणे यांनी काम पाहिले आहे.त्यांना सचिव शिवाजी शिंदे,श्री चौधरी यांनी सहाय्य केले आहे.दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.