जाहिरात-9423439946
निवड

…या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटी संचलित,के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कु.त्रिभुवन स्नेहल व निंबाळकर रामेश्वर यांनी राजूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे.

या स्पर्धेत के.जे.सॊमैय्या महाविद्यालयातील अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी कु.त्रिभुवन स्नेहल बापू हिने तृतीय क्रमांक (रोख रक्कम २००१ रू, प्रमाणपत्र), अकरावी कला शाखेतील विद्यार्थी निंबाळकर रामेश्वर ज्ञानेश्वर याने उत्तेजनार्थ ( रोख रक्कम ७०१ रू.प्रमाणपत्र) तसेच सांघिक राज्यस्तरीय फिरता स्मृती चषक पटकावला आहे.

अँड.एम.एन.देशमुख महाविद्यालय राजूर ता.अकोले यांच्या वतीने दि.१७ फेब्रुवारी रोजी कै.डॉ.माधवराव दिगंबर उमराणी स्मृती चषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत महाविद्यालयातील अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी कु.त्रिभुवन स्नेहल बापू हिने तृतीय क्रमांक (रोख रक्कम २००१ रू, प्रमाणपत्र), अकरावी कला शाखेतील विद्यार्थी निंबाळकर रामेश्वर ज्ञानेश्वर याने उत्तेजनार्थ ( रोख रक्कम ७०१ रू.प्रमाणपत्र) तसेच सांघिक राज्यस्तरीय फिरता स्मृती चषक पटकावला आहे.

दरम्यान या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव अँड.संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे,सुजित रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे,रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.यशस्वी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.सूर्यवंशी ए.एफ.,प्रा.बुधवंत डी. एस.,प्रा.जाधव डी.जे.,प्रा.भोंडवे जे.आर.,प्रा.मोरे बी.व्ही.यांचे मार्गदर्शन लाभले होते.

   या प्रकरणी फिर्यादी गणेश गरकल यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विकी शिंदे याचे विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा क्रं.४०/२०२४ भा.द.वि.कलम ३५३,३३२,३७९,५११,५०६,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे वाळूचोरांत दहशत पसरली आहे.

  दरम्यान या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जी.एस.वांढेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close