जाहिरात-9423439946
निवड

जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीच्या उपाध्यक्षपदी…यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीचे उपाध्यक्षपदी नानासाहेब भागवत निकम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष नानासाहेब निकम यांचा सत्कार करतांना आ.आशुतोष काळे समवेत चेअरमन गोरक्षनाथ जामदार.

  

आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते नानासाहेब भागवत निकम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.नानासाहेब निकम यांच्या नावाची सूचना सचिन आव्हाड यांनी मांडली त्या सूचनेला महेश लोंढे यांनी अनु‌मोदन दिले आहे.

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कोपरगांव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी शिंगणापूर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी संस्थेचे मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते नानासाहेब भागवत निकम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.नानासाहेब निकम यांच्या नावाची सूचना सचिन आव्हाड यांनी मांडली त्या सूचनेला महेश लोंढे यांनी अनु‌मोदन दिले.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष नानासाहेब निकम यांचे अभिनंदन केले आहे.

   याप्रसंगी संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,मावळते उपाध्यक्ष सुभाष सोनवणे,सचिन आव्हाड,संदीप शिंदे, गणेश गायकवाड,महेश लोंढे,संजय संवत्सरकर,नानासाहेब चौधरी,शंकर गुरसळ,पाराजी गवळी,विमलबाई गवारे,कांताबाई दहे,शिवाजी शेळके,संतोष वर्षे,जनरल मॅनेजर सुरेश काशिद आदी मान्यवर उपस्थित होते.उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नानासाहेब निकम यांनी माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष नानासाहेब निकम यांचा सत्कार करतांना आ.आशुतोष काळे समवेत चेअरमन गोरक्षनाथ जामदार.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close